Amravati university will take exams online for all streams  
विदर्भ

परीक्षांबाबत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ घेणार महत्त्वाचा निर्णय; सर्व शाखांच्या परीक्षा ऑनलाइनच

सकाळ डिजिटल टीम

अमरावती ः कोरोना संक्रमणामुळे अभियांत्रिकीसह सर्व शाखांच्या परीक्षा ऑनलाइनच घेण्याचे नियोजन आहे. असे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे परीक्षानियंत्रक डॉ. हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केले. अभियांत्रिकीच्या परीक्षांना चार दिवसांनी म्हणजे 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. उर्वरित शाखांच्या परीक्षा 15 एप्रिलपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोना संक्रमणाचा फटका विद्यापीठाला बसला आहे. विद्यापीठातील बहूतांश अधिकारी व कर्मचारी संक्रमणात सापडले असल्याने मनुष्यबळाचा तुटवडा जात आहे. ऑफलाइन परीक्षा घेणे विद्यापीठास त्यामुळे कठीण जात आहे. शैक्षणिक सत्राचा विचार करता अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षांना 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. महाविद्यालय स्तरावर या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

उर्वरित शाखांच्या परीक्षा 15 एप्रिल तर बॅकलॉगच्या परीक्षा पाच एप्रिलपासून घेण्याचे नियोजन आहे. त्यासंदर्भातील टिप्पणी तयार करण्यात आली असून मंजुरीकरिता कुलगुरूंकडे पाठविण्यात आली आहे, असे डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. या सर्व परीक्षाही ऑनलाइन घेण्यात येणार आहेत.

हिवाळी अभियांत्रिकी परीक्षेसाठी जवळपास तीस हजार विद्यार्थी आहेत. अभियांत्रिकी वगळता उर्वरित शाखांच्या परीक्षांसाठी सव्वादोन लाख तर पंचवीस ते तीस हजारच्या जवळपास बॅकलॉगचे विद्यार्थी आहेत. महाविद्यालयांना परीक्षा आणि मूल्यांकनाची जबाबदारी देण्यात येणार आहे.

संक्रमणाचा फटका

कोरोना संक्रमणाचा विद्यापीठाला चांगलाच फटका बसला आहे. बरेच अधिकारी व कर्मचारी या संक्रमणात सापडले आहेत. त्याचा एकूणच परिणाम कामकाजावर पडला असून मनुष्यबळाचा तुटवडा आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची दक्षता घेतली जात असून परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे, असे परीक्षानियंत्रक डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : दुष्काळसदृश परिस्थितीने सोयाबीन पिकाला फटका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मरडसगावात पिकांची पाहणी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT