Amravati ZP 
विदर्भ

Amravati ZP : ब्लॅकलिस्टेट एजन्सीला ‘रेडकार्पेट’; भरारी पथकाच्या वाहन निविदेवर प्रश्नचिन्ह

सुधीर भारती

अमरावती : जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षी भरारी पथकाकरिता वाहनांची व्यवस्था केली जाते, यंदाच्या भरारी पथकाच्या वाहन निविदेत गौडबंगाल झाल्याची बाब समोर आली आहे. आरोग्य विभागाने यापूर्वी सदोष कार्यप्रणालीचा ठपका ठेवून काळ्या यादीत टाकलेल्या एजन्सीलाच पुन्हा भरारी पथकातील वाहने पुरविण्याचा कंत्राट दिला. त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीबाबत संशय व्यक्त होत आहे.

आरोग्य विभागाकडून मेळघाटातील धारणी व चिखलदरा येथील भरारी पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दैनंदिन दौरा तसेच रुग्णांना रेफर करण्यासाठी भाडे तत्त्वावर वाहने घेतली जातात. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाते.

त्याअनुशंगाने गतवर्षी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली, मात्र कमी दराने वाहने लावणे परवडत नसल्याने अनेकांनी निविदा प्रक्रियेतून काढता पाय घेतला, मात्र याचाच फायदा घेत सर्वाधिक तक्रारी असलेल्या वाहन पुरवठादाराने वाहेन लावण्यासाठी संमती दिली. विशेष म्हणजे मागील पाच ते सहा वर्षांपासून एकाच पुरवठादाराकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

संबंधित एजन्सीला आरोग्य विभागानेच काळ्या यादीत टाकले होते, मात्र संबंधित एजन्सीला पुन्हा आरोग्य विभागानेच सकारात्मक शेरा देत पुनश्च वाहन पुरवठादार म्हणून निवडले आहे. निविदा प्रक्रियेत दिलेल्या सूचनांचे पालन यापूर्वी एजन्सीकडून झाले नव्हते.

ऑर्डरमध्ये नमूद वाहनांऐवजी जुनी वाहने भाडेतत्त्वावर देण्यात यावेत, अशा तक्रारी यापूर्वी झालेल्या आहेत. नवीन ऐवजी जुने भंगार वाहन देवून रुग्ण तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जिवाशी हा एकप्रकारे खेळच सुरू असल्याची चर्चा जिल्हापरिषदेत सुरू आहे.

मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

भरारी पथकातील वाहन कंत्राटासंदर्भातील अनियमितता पाहता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून चौकशी गरजेची आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधित कंत्राट रद्द करण्याची मागणी होत आहे.

वाहनांची सेवाही ‘भंगार’

भरारी पथकातील भाडेतत्त्वावरील वाहनेच केवळ भंगार असतात असे नाही तर आतापर्यंतच्या पुरवठादारांची सेवासुद्धा ‘भंगार’असल्याचे मेळघाटातील वैद्यकीय अधिकारी सांगतात. अनेकदा तर डिझेलचे कारण दाखवून वाहने जागीच उभी ठेवली जातात, तर अनेक वाहनांचे टायर्स सुद्धा बदलविण्यात येत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Katraj News : भारती विद्यापीठ भागात हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भडका; चारजण जखमी

Manchar Crime : मंचर येथे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले; एसीबीची कारवाई

SCROLL FOR NEXT