Teacher esakal
विदर्भ

Amravati News : मध्यरात्री झाली बदली, पहाटे गुरुजींना बसला सुखद धक्का

चार हजारांवर शिक्षकांच्या बदल्या पूर्ण, अकरा हजार बदलीच्या प्रतीक्षेत.

सकाळ वृत्तसेवा

अमरावती - जिल्हा परिषद शिक्षकांची बहुप्रतिक्षीत आंतरजिल्हा बदलीप्रक्रिया काल मध्यरात्रीनंतर पूर्ण झाली. विशेष म्हणजे, मध्यरात्रीच बदली झालेल्यांना बदलीचे ई-मेल प्राप्त झालेत. बदल्या न झालेल्यांनासुद्धा मेल करण्यात आले. राज्यातील जवळपास चार हजार शिक्षकांच्या बदल्या या प्रक्रियेंतर्गत झाल्या असून, अद्यापही अकरा हजार शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. आज (ता. ३०) सकाळी शिक्षकांना आपल्या मेलवर बदलीचे आदेश दिसताच त्यांना सुखद धक्का बसला.

अधिकाधिक बदल्या व्हाव्यात, यासाठी साखळीचे जास्तीत जास्त राउंड घेण्यात आले. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये जागा रिक्त नसतानाही साखळी पद्धतीने बदल्या झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात सर्व जागा शून्य असतानाही साखळी पद्धतीने बदल्या करण्यात आल्या. एकूण १५ हजार शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले होते, हे विशेष.

आंतर जिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेसाठी शासनाकडून एकदा संधी दिली जाणार असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत ग्रामविकास विभागाकडून मिळाले आहे.

आंतरजिल्हा प्रतीक्षा यादी होणार जाहीर

ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत, त्यांची प्रतीक्षायादी कायम राहणार असून जिल्हा परिषदेत जसजशी पदे रिक्त होतील, त्या यादीनुसार प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे. मात्र तूर्तास नवीन अर्ज करण्याची संधी नसणार, अशी माहिती प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT