tiger 
विदर्भ

...अन्‌ अचानक आला "तो' समोर! पसरली सर्वत्र दहशत 

सकाळ वृत्तसेवा

चांदूर बाजार (जि. अमरावती)  : तालुक्‍यातील शिरसगाव अर्डक व राजुरा परिसरात वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात व तालुक्‍यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

रस्त्यावर दिसला वाघ

गुरुवारी (ता.9) रात्री 9.30 वाजताच्या सुमारास शिरजगाव अर्डक गावाजवळ गजानन वानखडे गावामध्ये जात असताना रस्त्यावर त्यांना वाघ दिसला. याची सूचना त्यांनी गावकऱ्यांना दिली. त्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळतात वनविभागाची चमू गावामध्ये दाखल झाली. त्यानंतर त्यांनी त्या भागात वाघाची शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्र झाल्याने पुन्हा सकाळी घटनास्थळी जाऊन परिसराची पाहणी करताना वाघाचे पगमार्क आढळून आले. हे पगमार्क सोळा बाय सोळाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हाच वाघ वनरक्षक पी. के. वाटाणे यांना शुक्रवारी सकाळी राजुरा शिवारात दिसून आला. त्याचेही पगमार्क घेतले असता सोळा बाय सोळाचे असल्यामुळे हाच तो वाघ असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. 

परिसरात भीतीचे वातावरण

तो वाघ मोर्शी वनपरिक्षेत्रात दाबेरी जंगलात गेला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. वाघाचे दर्शन झाल्यामुळे शिरजगाव अर्डक, जवळा, तळवेल, खरवाडी, बेलोरा, राजुरा या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी सतर्क राहण्याकरिता काही ग्रामपंचायतींनी गावात दवंडी सुद्धा दिली आहे. 

नागरिकांनो सावध रहा! 

परिसरातील नागरिकांनी दोन-तीन दिवस सावधगिरी म्हणून रात्रीला शेतात जाण्याचे टाळावे. शेतातून लवकर घरी या. आपल्या पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवा, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार आम्ही घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता ते पगमार्क वाघाचे असल्याचे आढळून आले. 
- पी.एस. भड, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT