Angels who make children ..!, Suman Aaji's uninterrupted service; They cultivate a culture that is old and golden, washim akola marathi news 
विदर्भ

मासाच्या गोळ्याला आकार देणार्‍या देवदूत..!, सुमनआजींची अविरत सेवा ; जुने ते सोने ठरणारी संस्कृतीची करतात जोपासना

राजदत्त पाठक

वाशीम : ‘मुले  म्हणजे देवाघरची फुले’ असे का म्हणतात याचा प्रत्यय, या फुलांना जपायचे कसे याची शिकवण देणार्‍या सुमनबाई खुपसे या माऊलीच्या सेवाभावी कार्यातून  बघायला मिळते. आईने जन्म दिलेल्या मासाच्या गोळ्याला आकार देण्याचे कार्य त्या अव्याहतपणे गेल्या तीस वर्षापासून करीत आहेत. 21 व्या शतकात आजीबाईचा बटवा नावाची जुने ते सोने ठरणारी संस्कृती त्या जोपासत आहेत.                          
नऊमहिने  आईच्या गर्भात वास्तव्य असलेल्या मुला - मुलीचा जन्म होतो तेव्हा ते इवलेसे बाळ म्हणजे मासाचा गोळा असतो. बाळंतपणानंतर डॉक्टर महिलेला सुटी देतात याच वेळेपासून सुरू होते सुमनआजींचे कार्य.

नऊमहिने आईच्या गर्भात इवल्याशा जागेत राहिल्याने बाळाचे अवयव जखडलेले असतात. बाळाला योग्य प्रकारे  रोज मॉलीश करून हातपाय लांब करणे, कमरेला, डोक्याला आकार देणे म्हणजे एकप्रकारे मासाच्या इवल्याशा गोळ्याची फिजिओथेरेपी करण्याचे काम आजी करतात. 

बाळांच्या आरोग्यासाठी नवमातांना देता आयुर्वेदाची माहिती
नवमातांना बाळाचे संगोपन कसे करावे याची माहिती देणे. छोट्या मोठ्या आजारासाठी आजीबाईच्या बटव्यातील मूरडशेंग, कायफळ, मायफळ, जेष्ठमध अशा वनस्पती वापरून बाळाचे आरोग्य जपण्याचे मार्गदर्शन त्या करतात. देतील तो मोबदला घेऊन जवळपास 1985 पासून त्यांचे कार्य सुरू आहे. ज्या मुलामुलींना आकार देण्याचे काम त्यांनी 20-25 वर्षापूर्वी केले.  त्याच्या  मुलांना त्या आज आकार देत आहेत.  

देव मासाच्या गोळ्याला जन्म देतो. आणि सुमनआजी त्याला आकार देणार्‍या जणू  देवदूत ठरल्या आहेत. वाशीम शहरातच नाही तर पुणे-मुंबई मधील नागरिक आपल्या नवजात  बालकाच्या  जन्मापूर्वी आजी तुम्हाला आमच्या नवजात बालकाला आकार देण्यास यावे लागेल, अशी मागणी केल्या जाते. मात्र, वयामुळे त्या शहरातच कार्य करतात. त्यांच्यानंतर हा सेवाभावनेचा वसा कोण पुढे नेणार ही काळजी मात्र त्या करतात. कारण कितीही आधुनिकता जोपासली तरी काही परंपरा भावी पिढीच्या सृदृढतेसाठी कायम ठेवाव्याच् लागतात.

चिमुकल्याची ‘फिजिओथेरेपी’
बाळाला योग्य प्रकारे रोज मॉलीश करून हातपाय लांब करणे, कमरेला, डोक्याला आकार देणे म्हणजे एकप्रकारे मासाच्या इवल्याशा गोळ्याची फिजिओथेरेपी करण्याचे काम सुमनआजी करतात. नवमातांना बाळाचे संगोपन कसे करावे याची माहिती देणे. छोट्या मोठ्या आजारासाठी आजीबाईच्या बटव्यातील मूरडशेंग, कायफळ, मायफळ, जेष्ठमध अशा वनस्पती वापरून बाळाचे आरोग्य जपण्याचे मार्गदर्शन आजी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT