file photo
file photo 
विदर्भ

साडेतेरा लाख उत्तरपत्रिकांचे मास्किंग पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने यंदाच्या काही उन्हाळी परीक्षांचे निकाल मुदतीच्या आत दिले. आता साडेतेरा लाख उत्तरपत्रिकांचे मास्किंग करून त्या मूल्यांकनासाठी तयार ठेवण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचे निकाल आतापर्यंत कधीही मुदतीच्या आत लागले नाहीत. त्यातच विद्यापीठाचे गुणवाढ प्रकरणे, तत्कालीन कुलगुरू कन्या गुणवाढ प्रकरण, नुकतेच पेपर फुटीचे विधानसभेत गाजत असलेले प्रकरण लक्षात घेता असल्या प्रकाराला यापुढे आळा बसावा यासाठी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी यंदा परीक्षा विभागावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.
आतापर्यंत 60 हजार उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण झाले. साडेतेरा लाख उत्तरपत्रिका मास्किंग करून मूल्यांकनासाठी तयार ठेवण्यात आल्या. यंदा विविध शाखांमधून साडेचार लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांना संबंधित विद्यार्थ्यांचा परीक्षा क्रमांक दिसू नये म्हणून त्यावर प्रथम मास्किंग करण्यात येते. या साडेतेरा लाख उत्तरपत्रिकांचे मास्किंग करण्यासाठी मूल्यांकन अधिकाऱ्यांच्या दिमतीला 25 अधिकारी व 150 कर्मचारी देण्यात आले होते. या सर्वांनी अवघ्या दीड महिन्यात हे काम पूर्ण केले. यामुळे आता मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज किमान पाचशेपेक्षा जास्त शिक्षक मूल्यांकन करण्यासाठी उपस्थित असतात. कोणत्या परीक्षा क्रमांकाला किती गुण मिळाले हे दिसू नये म्हणून डी मास्किंग करण्यात येते. यानंतर टॅब्युलेशन, कंट्रोलशीटवर गुण लोड करण्यात येऊन ते विशिष्ट विभागाकडे पाठविण्यात येतात. त्यानंतर परीक्षा विभाग निकाल जाहीर करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT