File photo 
विदर्भ

कोणी साप देता का साप...

विनोद पिल्लेवान

उमरेड  : सर्पमित्र ही संकल्पनाच मान्य नसणाऱ्या वनविभागाला सर्पमित्रांची गरज भासू लागली आहे. सर्पदशांवरील "अँटी व्हेनम' तयार करण्यासाठी सापाच्या विषाची गरज असल्याने हाफकिनचे कर्मचारी कर्मचारी उमरेड तालुक्‍यात दाखल झाले असून सर्पमित्रांकडे साप व विषाच्या मागणीसाठी साकडे घालत आहेत.
मागील तीन ते चार दिवसांपासून हाफकिनचे कर्मचारी नागपूर जिल्ह्यात आहेत. मात्र, वनविभागाचे कोणतेही लेखी आदेश त्यांच्याकडे नाहीत. हाफकिनच्या कर्मचाऱ्यांनी नागपूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांची मदत घेतली. मात्र, मौखिक आदेश देऊन तेही मोकळे झाले. उमरेडचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश नसल्याचे सांगितले. प्रादेशिक डीएफओ प्रभूनाथ शुक्‍ला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. या कर्मचाऱ्यांकडे असलेल्या पत्रात साप पकडण्यासाठी आवश्‍यक ती मदत वनविभाग व मानद वन्यजीव रक्षक करतील असे नमूद आहे. हे पत्र "सकाळ'कडे उपलब्ध आहे. मात्र सर्पमित्रांची मदत घ्यावी असा स्पष्ट उल्लेख त्यात नाही.
नागपूर विभागात हवी संस्था
विषारी सापांच्या जातीनुसार विष प्रतिबंधक लस तयार करण्यात येतात. दंश करणाऱ्या विषारी सापाची ओळख झाल्यास केवळ 5 ते 10 प्रतिबंधक लस टोचल्यावर रुग्ण बरा होऊ शकतो. हाफकिनसारखी संस्था नागपूर विभागात व्हावी ही सर्पमित्रांची जुनी मागणी आहे.
सर्पमित्र केवळ कागदावरच
स्वतःचा जीव धोक्‍यात घालून साप पकडून त्याला सुरक्षित स्थळी सोडणाऱ्या सर्पमित्रांना नेहमी कायदा आडवा येतो. जवळपास वीस वर्षांपासून सर्पमित्रांची या जाचातून सुटका होण्यासाठी संघर्ष करीत आहे. अनेकदा वनविभागाने घेतलेल्या या सर्पमित्रांच्या मुलाखती कागदावरच राहिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT