ant  ant
विदर्भ

उपचार घेत असलेल्या रुग्णाला चावल्या मुंग्या; विविध भागांना चावा

विष्णूपंत साठवणे यांच्या एका डोळ्याखाली व शरीराच्या दुसऱ्या भागावक मोठ्या जखमा केल्या होत्या

प्रशिक मकेश्वर.

अमरावती : शहराच्या पंचवटी चौकात असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Dr. Punjabrao Deshmukh Medical College and Hospital) अर्धांगवायूच्या आजारावर एमआयसीयू विभागात उपचार घेणाऱ्या ७१ वार्षीय रुग्णांच्या (patient) शरीराच्या विविध भागांवर मुंग्यांनी चावा (ants bite) घेतला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने रुग्णालयाच्या आरोग्य सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, विष्णूपंत साठवणे (वय ७१) असे रुग्णाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे बुधवारी सायंकाळी त्यांना उपचारासाठी अमरावती शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी त्यांच्या शरीराच्या विविध भागांवर लाल मुंग्यांनी चावा घेत जीवघेणा हल्ला केला.

यामध्ये विष्णूपंत साठवणे यांच्या एका डोळ्याखाली व शरीराच्या दुसऱ्या भागावक मोठ्या जखमा केल्या होत्या. सकाळी रुग्णाच्या नातेवाइकांचे लक्ष गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने डॉ. पंजाबराव रुग्णालयातील आरोग्य सुविधेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

या रुग्णाला काल रात्री भरती करण्यात आले होते. त्यांना स्माईल्ड पॅरेलाईस अटॅक आला होता. ते डायबीटीजने ग्रस्तही आहे. एमआयसीयू वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. त्यांच्या अंगावर काही प्रमाणात मुंग्या आढळून आल्या. त्यामुळे वॉर्डातील स्टाफला नोटीस बजावण्यात आली आहे. यापुढे अशी घटना घडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
- अनिल देशमुख, डीन, डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT