Anushka Badukle of Ner in Yavatmal district became a child poet of Maharashtra 
विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यातील नेरची अनुष्का बदुकले ठरली महाराष्ट्राची बालकवी

गणेश राऊत

नेर (जि. यवतमाळ) : ‘कोण होणार महाराष्ट्राचा बालकवी २०२१?’ या राज्यस्तरीय काव्यगायन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात नेर परसोपंत येथील शांतीनिकेतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी अनुष्का शीतल संतोष बदुकले हिने बाजी मारली आहे. उच्च प्राथमिक गटातून महाराष्ट्रातून तृतीय क्रमांकाचे विजेती होत बालकवी होण्याचा बहुमान अनुष्काने पटकाविला आहे.

विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना मुक्त आविष्काराची उच्चतम संधी लाभावी या हेतूने ‘कोण होणार महाराष्ट्राचा बालकवी?’ या स्वरचित काव्यगायन स्पर्धेचे भव्य आयोजन राज्यस्तरावर करण्यात आले होते. प्राथमिक गट, उच्च प्राथमिक गट व माध्यमिक गटात घेतल्या गेलेल्या स्पर्धेला महाराष्ट्रभरातून उदंड प्रतिसाद लाभला.

विद्यार्थ्यांच्या भावअभिव्यक्ती व कलारसिकतेला आव्हान देणाऱ्या स्पर्धेत महाराष्ट्राचा बालकवी कोण होणार याची प्रचंड उत्सुकता लागली होती. उच्च प्राथमिक गटातून उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या वर्ग सहावीच्या प्रतिभावान अनुष्का संतोष बदुकलेची सदर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तिच्या ‘कविता’ या स्वरचित कवितेला महाराष्ट्रभरातून पसंती मिळाली आहे. आकर्षक स्म्रृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन तिचा गौरव होणार आहे.

वक्तृत्वासोबतच तंत्रज्ञानातही अनुष्का अव्वल

बालवयापासूनच शब्दांचे वेड असलेल्या अनुष्कांच्या अनेक कविता प्रकाशित झाल्या आहेत. तिचे काव्यलेखन व सादरीकरण उत्तम दर्जाचे आहे. तिच्या कवितांचा संग्रह करीत आहे. कथाकथन, स्वरचित काव्य रचना, वक्तृत्वासोबतच तंत्रज्ञानातही अनुष्का अव्वल आहे. नुकतेच झालेल्या एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या जागतिक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या अंतराळ मोहिमेतही ती सहभागी होती हे विशेष...

अनुष्का ही अष्टपैलू विद्यार्थिनी

अनेक स्पर्धा गाजवलेल्या अनुष्का ही अष्टपैलू विद्यार्थिनी आहे. या लॉकडाउन काळामध्ये अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. महाराष्ट्राचा बालकवी या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकापेक्षा एक सरस विद्यार्थी कविंना मागे टाकत अनुष्का महाराष्ट्राची बालकवी ठरली आहे. तिचे या घवघवीत यशाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना व शिक्षकांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दिल्लीत घडामोडींना वेग; सुप्रिया सुळेही सोबत, काय झाली चर्चा?

NEET वादावरून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का घेतला जात नाही?; मोदी सरकारच्या भूमिकेची Inside Story... 8 प्रमुख कारणे

Live Updates Marathi : भाजप सरकार गोरगरिबांवर लाठ्या चालवतं; मनोज जरांगेंंनी जंतर मंतरवर व्यक्त केला संताप

Monsoon Update : मॉन्सूनसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे ! 'एल निनो'चे सर्वात धोकादायक रूप पाहायला मिळणार, दक्षिण भारतात दुष्काळसदृश्य परिस्थिती

निवृत्तीनंतर अरिजित सिंगचं मोठं कमबॅक! 'या' सिनेमासाठी पुन्हा धरला माईक, भावनिक नात्यासाठी पुनरागमन

SCROLL FOR NEXT