राजेश थोराणे
राजेश थोराणे 
विदर्भ

वाडीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी थोराणे

सकाळ वृत्तसेवा

वाडी  (जि.नागपूर) :  शासनाच्या नगरविकास विभागाने वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे यांना एका लाच प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या अहवालाच्या आधारावर दोषी ठरवित 19 ऑगस्टच्या एका आदेशान्वये त्यांना पदावरून पदमुक्त करण्याचे आदेश दिले. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर वर्तमान उपाध्यक्ष राजेश थोराणे यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्षपदाचा कार्यभार सोपवण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.20) जारी केलेल्या या पत्रानुसार झाडे यांना पदावरून पायउतार व 6 वर्षांसाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागापासून वंचित करण्यात आले. न. प. प्रशासनाला 21 ऑगस्टला आदेशपत्र प्राप्त होताच सूचनेनुसार कार्यवाही करीत माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांना पदावरून दूर करून राजेश थोराणे यांना नगराध्यक्षपद हस्तांतरण करण्याची कार्यवाही पूर्ण केली. थोराणे यांनी बुधवारी दुपारनंतर नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले, उपमुख्याधिकारी आकाश सहारे, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांना सोबत घेऊन वाडीच्या विकासाची वाटचाल करू, असे मत नवनियुक्त नगराध्यक्ष राजेश थोराणे यांनी पदभारग्रहण केल्यानंतर व्यक्त केले. दरम्यान, झाडे यांना बरखास्तीच्या आदेशावर न्यायालयातून स्थगिती मिळाली नसल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT