file photo 
विदर्भ

झेडपीवर प्रशासक नियुक्ती चार महिनेच

नीलेश डोये

नागपूर  : जिल्हा परिषदांना देण्यात आलेल्या मुदतीवाढीवरून चांगलाच पेच निर्माण झाला. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून फटकारही खावी लागली. आता शासनाने प्रशासक नियुक्तीसंदर्भात मर्यादा निश्‍चित केली असून, चार महिने प्रशासक राहू शकणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत ही मुदत दोन महिन्यापर्यंत वाढविता येईल.
नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या काही ग्रामपंचायतींचा दर्जा उंचावून नगरपंचायत, नगर परिषद करण्यात आले. यामुळे जिल्हा परिषद निवडणुका राज्य निवडणूक आयोगाला घेता आल्या नाही. यावर निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली होती. राज्य सरकारने जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती न करता मुदतवाढ दिली. ही वाढ जवळपास सव्वा दोन वर्षे होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती कायद्यात मुदतवाढीबाबत कोणतीही तरतूद नसल्याने राज्य सरकारने दिलेली वाढ नियमबाह्य असल्याचेही चर्चा रंगली. जिल्हा परिषदेतील जागांचे आरक्षण 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असल्याने न्यायालयात कायद्याला आव्हान देण्यात आले. सरकारने कायद्यात सुधारणा केली नाही. त्यामुळे नागपूरसह धुळे, नंदूरबार, अकोला आणि वाशीम या पाच जिल्हा परिषदांच्याही निवडणुका घेता मुदतवाढ देण्यात आली. एका सदस्याचे सदस्यत्व रद्द केल्याने प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. कायद्यात मुदतवाढीची तरतूद नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवला. सर्वोच्च न्यायालयाच्या भीतीने महाराष्ट्र सरकारने या पाचही जिल्हा परिषदा बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली. राज्य सरकारने आता कायद्यात सुधारणा करून प्रशासकाच्या नियुक्तीची मर्यादा निश्‍चित केली. यानुसार जिल्हा परिषदांवर प्रशासकाची नियुक्ती चार महिने असणार आहे. अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास ही मुदत दोन महिन्यापर्यंत वाढविण्यात येईल.
जानेवारीत निवडणुका
सरकारने पाच जिल्हा परिषदांवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. ओबीसींच्या जागा निश्‍चित करण्यासाठी घेण्यात आलेल्या लोकसंख्येच्या अटीमुळे निवडणुकीत अडथळा निर्माण झाला आहे. या सुधारणेनुसार सहा महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागणार असल्याने जानेवारी 2020 पूर्वी जिल्हा परिषदांकरता निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: शिवकालीन आणि शाहूकालीन इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन!

Satara ZP Controversy: सातारा झेडपीतील गोंधळाचे मंत्री गोरेच सूत्रधार: देसाई, मांडवे; आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा होता डाव!

लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये! एप्रिलमध्ये ज्यांना मिळेल लाभ, त्यांचाच सुरु राहणार लाभ; ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी ३१ मार्च मुदत, वाचा...

Panchang 26 March 2026 : दत्त कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

आजचे राशिभविष्य - 26 मार्च 2026

SCROLL FOR NEXT