आनंदराव गेडाम
आनंदराव गेडाम  
विदर्भ

आरमोरी विधानसभेत कॉंग्रेसमध्ये उमेदवारीसाठी होणार रस्सीखेच

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून त्यासाठी विविध पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच झाली होती. आता विधानसभेतही कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे आरमोरी विधानसभा क्षेत्रातून कॉंग्रेसच्या तिकिटावर उभे राहण्याची इच्छा असलेले माजी आमदार आनंदराव गेडाम यांना वामनराव सावसाकडे यांचे आव्हान मिळण्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात यंदाही मतदारांचा मतदानाला भरघोस प्रतिसाद मिळाला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच खऱ्या अर्थाने विद्यमान आमदारांच्या परिश्रमाचे मूल्यमापन झाले. आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच इच्छुक असलेल्या उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आरमोरी विधानसभा मतदार क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आरमोरी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची दाट शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. नव्या उमेदवाराची निवड व अन्य नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे पाठबळ कशा पद्धतीने मिळते आणि भाजपला कशी टक्कर देतात, हे पाहण्यासारखे राहील. मागील विधानसभा निवडणुकीत आनंदराव गेडाम यांचा विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांनी पराभव केला होता. त्यामुळे पराभव झालेल्या उमेदवाराला पुन्हा तिकीट द्यावे काय, हा विचारसुद्धा पक्षात सुरू आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने आदिवासी तथा गैरआदिवासींना चालणारा उमेदवार द्यावा तसेच नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्ते करीत आहेत. या विधानसभा क्षेत्रात माना जमातीची मतदार संख्या अधिक आहे. त्यामुळे या समाजातील उमेदवार असल्यास जिंकण्याची शक्‍यता वाढते. म्हणूनही कदाचित सावसाकडे यांच्याकडे झुकते माप जाण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेस पक्षाकडून माजी आमदार आनंदराव गेडाम उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांनी जनसंपर्क व कार्यक्रमांचे प्रमाण वाढविले आहे. तर, दुसरीकडे नव्या चेहऱ्यांपैकी वामनराव सावसाकडे यांनीही आरमोरी विधानसभा क्षेत्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे. पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी असलेले सावसाकडे उत्तम नाट्यकलावंतही आहेत. त्यांनी सामाजिक व कृषी क्षेत्रात काम केले असून शेती मार्गदर्शक म्हणूनही कार्य करतात. मागील काही वर्षांपासून त्यांचा राजकारणातही वावर आहे.

एक संधी हुकली
लोकसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्याला उमेदवारी देण्याची संधी कॉंग्रेसकडे आली होती. डॉ. नितीन कोडवते यांनी जिल्हाभरात झंझावाती प्रचार सुरू केला होता. त्यांना विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे समर्थन असल्याचीही चर्चा होती. पण, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी दिल्यामुळे नवा चेहरा पुढे आणण्याची कॉंग्रेसची संधी हुकली. या निवडणुकीत डॉ. उसेंडी यांना विद्यमान खासदार अशोक नेते यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. आता ते गडचिरोली विधानसभेसाठी प्रयत्न करत असल्याचीही चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT