asha-workers akola.jpg 
विदर्भ

'कोरोना'तली कर्तव्यनिष्ठा! ग्रामीणची धुरा यांच्यावर

सकाळ वृत्तसेवा

अकोला : संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला असतानाच जिल्ह्यातील ग्रामीण भागात अद्यापपर्यंत कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव होऊ शकला नाही. आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, एएनएम, आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविका यांनी जनजागृतीची धुरा समर्थपणे सांभाळल्यानेच हे शक्य झाले असे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

कोरोना आजारावर अद्याप परिणामकारक औषण उपलब्ध नाही. या आजारापासून बचाव करायचा असेल तर केवळ जनजागृती करुनच या रोगाच्या प्रसाराला आळा घालता येऊ शकतो. अद्यापही या आजाराचा धोका कमी झालेला नाही. याकरिता आरोग्या विभागामार्फत जनजागृतीच्या उद्देशाने कोरोना आजाराबाबत माहिती देणारे पोस्टर्स बॅनर्स लावण्यात आले. तसेच जनतेला घरीच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. या आजारापासून बचावा करीता वारंवार साबनाने हात धुवावे, हॅंड सॅनिटायझरचा वापर करावा, तोंडाला मास्क लावावा, सर्दी, ताप, श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यास तात्काळ आरोग्य संस्थेशी संपर्क करुन तपासणी करुन घ्यावी, याबाबत जनतेला माहिती देण्यात येत आहे. 

ग्रामीण भागात सर्व्हेक्षण सुरु
जिल्ह्यात सध्या कोरोना आजाराबाबत आशा स्वयंसेविकांमार्फत सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. रखरखत्या उन्हात जिवाचा धोका पत्करुन गावात माहिती गोळा करण्याचे काम आशा करीत आहेत. त्याकरिता जनतेने सुद्धा आशांना आवश्‍यकती माहिती देवून तसेच दिलेल्या सल्ल्यांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. असोले यांनी केले. 

20 हजार 532 रुग्णांची तपासणी 
जिल्ह्यात कोरोना आजाराचा मागील चार दिवसांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. ही बाब समाधानाची असून याकरीता जनतेने मागील एक महिण्यापासून ज्या प्रमाणे विनाकारण बाहेर न पडता घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे आजावर नियंत्रण मिळविता आले. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आजपर्यंत 20 हजार 532 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने अशाच प्रकारे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. असोले यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT