Vithai bus 
विदर्भ

Ashadhi Wari : आषाढीसाठी अकोला विभागातून २२० ‘विठाई एक्स्प्रेस’ धावणार‎! २५ जूनपासून सुरुवात

सकाळ डिजिटल टीम

अकोला : पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी‎ अकोला एसटी विभागाने २२० वारी विशेष ‘विठाई एक्स्प्रेस’ गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे नियोजन करण्यात आले असून, २५ जून ते ४ जुलैदरम्यान अकोला स्थानकावरून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. तयारी‎ केली आहे.

यावर्षी ता. २९ जून रोजी आषाढी‎ एकादशी आहे. उत्सवासाठी पंढरपूर‎ येथील विठुरायाच्या दर्शनासाठी‎ अकोला जिल्ह्यातील लाखो भाविक जातात. जिल्ह्याच्या विविध भागातून निघणाऱ्या पालख्यांसोबतही‎ भाविक पायी पंढरपूरला जातात.‎ पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसह‎ वाहनांद्वारे जाणाऱ्यांचीही संख्या‎ मोठी असते. त्यामुळे एसटी बसवर प्रवाशांची गर्दी होते.

गर्दीच्या काळात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटीच्या अकोला विभागाने वारीसाठी विशेष बस गाड्यांचे‎ नियोजन केले आहे.‎ वारीसाठी जाणाऱ्या भाविकांना वेळेत पोहोचता यावे म्हणून ता. २५ जूनपासून पंढरपूरकडे‎ गाड्या सोडण्यात येणार आहे. वारीनंतर ४ जुलैपर्यंत परत येणाऱ्या प्रवाशांची संख्या बघता बस सोडण्यात‎ येणार आहे. अकोला विभागात‎ एकूण नऊ आगार आहेत. या नऊ आगारातून‎ एकूण २०० बस प्रवाशांसाठी‎ उपलब्ध करून देण्यात येणार‎ आहेत.‎

‘ना नफा ना तोटा’ पद्धतीने सोडणार बस

पंढरपूर यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून ‘ना नफा ना तोटा’ या तत्‍वावर‎ बस सोडण्यात येणार आहे. बसच्या क्षमतेपेक्षा ७५‎ टक्केच प्रवाशांनी एखाद्या‎ बसमधून प्रवास केला तर, ना नफा‎ तोटा या पद्धतीने बस चालते.‎ अर्थात महामंडळाचा ब्रेक- इव्हन‎ ७५ टक्के लोड फॅक्टरवर आहे.‎ त्यामुळे यात्रेच्या काळात लोड‎ फॅक्टर त्यापेक्षा कमी येणार नाही,‎ तसेच महामंडळाचे नुकसान‎ होणार नाही, याची दक्षता घेतली‎ जाणार आहे.‎

इतर विभागातून घेणार ७५ गाड्या

अकोला विभागात येणाऱ्या अकोला व वाशीम जिल्ह्यातील सर्व आगारमिळून २२० बस पंढरपुरकरिता पाठविल्या जाणार आहेत. मात्र, विभागात या गाड्यांचे नियोजन करताना ७५ गाड्या कमी पडत असल्याने इतर विभागातून या गाड्या बोलावून नियोजन केले जाणार आहे.

आगारनिहाय्य गाड्यांचे नियोजन

अकोला १ : ३०

अकोला २ : ४२

अकोट : १६

कारंजा : १६

मंगळरुळपीर : १६

वाशीम : ४२

रिसोड : ३८

तेल्हारा : १३

मूर्तिजापूर : ०७

एकूण : २२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT