file photo 
विदर्भ

Vidhan sabha 2019 अशोक सिद्धार्थ म्हणतात, बसप राज्यात खाते उघडणार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार मजबूत स्थितीत आहेत. त्यामुळे यावेळी बसपचे खाते उघडेल, असा विश्‍वास प्रदेश प्रभारी खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला.
राज्यात बसपने 268 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. आमची ताकद माहिती आहे. आमच्या खूप जागा निवडून येतील, असे आम्ही म्हणणार नाही. परंतु, विदर्भात आमच्या पक्षाचा चांगला जनाधार आहे. चार ते पाच जागांवर आम्ही मजबूत आहोत. उत्तर नागपूर मतदारसंघ आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो. मागील निवडणुकीत या मतदारसंघातून बसपचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. हजारांवर मते आम्ही घेतली होती. यंदा येथून खुद्द पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनाच रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे ही जागा आम्ही खेचून आणू, असा दावा डॉ. सिद्धार्थ यांनी केला. भाजप, कॉंग्रेस वगळता इतर पक्षासोबत युतीची आमची तयारी होती. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करण्याबाबत काही विचारवंतांनी सूचना केल्या होत्या. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत संपर्कही केला. मात्र, त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, जितेंद्र घोडेस्वार, कृष्णा बेले, उत्तम शेवडे आदी उपस्थित होते.
मायावती यांची सभा सोमवारी
बसपच्या विदर्भातील सर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांची जाहीर सभा येत्या सोमवारी 14 ऑक्‍टोबरला दुपारी 3 वाजता उत्तर नागपुरातील इंदोरा मैदान येथे आयोजित केली असल्याचे डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan 2026 : कसबा ते दगडूशेठ... पुण्यात आज गणरायाला निरोप; विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी

आजचे पंचांग 25 सप्टेंबर 2026! अनंत चतुर्दशी, गणपती विसर्जन; जाणून घ्या राहुकाळ आणि शुभ मुहूर्त

आजचे राशिभविष्य - 25 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 सप्टेंबर 2026

Hotel Gas Leakage : हॉटेलच्या किचनमध्ये गॅस गळती; सिलेंडरने घेतला पेट, कोंढवा बुद्रुकमधील घटनेत दोन कामगार जखमी

SCROLL FOR NEXT