आगरगाव : आगरगाव-नाचणगाव मार्गाची झालेली दुरवस्था.  
विदर्भ

आगरगाव-नाचणगाव मार्गाच्या डांबरीकरणाला मुहूर्त सापडेना; सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत

सूरज फुसाटे

आगरगाव (जि. वर्धा) : आगरगाव नाचणगाव रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे ‘सकाळ’ने वेळोवेळी बातम्यांद्वारे पाठपुरावा केला. तेव्हा, गत महिन्याअगोदर बांधकाम विभागाने आगरगाव-नाचणगाव या रस्त्याची याच महिन्यांत दुरुस्ती होणार, असे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्‍वासन आता हवेतच विरल्याचे दिसत आहे.

रस्त्याची दुरवस्था होऊनसुद्धा बांधकाम विभाग दुरुस्तीकडे कानाडोळा करीत आहे. या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्याने रोजचेच अपघात होत आहेत. या रस्त्याने वाळू वाहून नेणारी अवजड वाहने जास्त धावतात. त्यामुळे, या रस्त्याची पूर्णतः चाळणी झाली आहे. दिवसा रात्री वाहने चालू असताना रस्त्यावर पूर्णतः धुळीचे लोट दिसून येत आहेत.

त्यामुळे, असंख्य दुचाकीधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे, रोजचेच अपघात घडत आहेत. परिणामी रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.

नाचणगाव ते देवळी पर्यंतचा पूर्ण रस्ता हजारो खड्ड्यांनी व्यापला आहे. त्यामुळे, अपघाताच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. रस्त्यावर उखडलेल्या खड्ड्यातील दगड चाकांमधून उसळून दुसऱ्या वाहनचालकांना लागण्याच्या घटना घडत आहेत. लहान-लहान अपघात तर नित्याचीच बाब झाली आहे. या खड्‌डेमय रस्त्यांमुळे अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. रस्ता कमी आणि खड्‌डे जास्त अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे.

रस्त्यावर असतात दिवस रात्र धुळीचे लोट

या रस्त्यावरील डांबर पूर्णतः उखडले गेल्याने गिट्टी मुरूम बाहेर आला आहे. त्यामुळे, वाहने धावताना दिवसरात्र रस्त्यावर धुळीचे लोट पहावयास मिळत आहेत. त्यामुळे, अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अन्यथा आंदोलन करू
आगरगाव-नाचणगाव रस्त्याची इतकी दुर्दशा झाली की दुचाकी वाहनसुद्धा मोठ्या शिताफीने चालवावी लागत आहे. रस्ता खराब असल्यामुळे, वाहने धावताना रस्त्यावर धुळीचे लोट दिसून येत आहेत. त्यामुळे, अपघातातसुद्धा रोजचेच घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने झोपेतून जागे होऊन या रस्त्याच्या दुरुस्तीला लवकरात लवकर सुरुवात करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
- विशाल थुल,
वंचित बहुजन आघाडी


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT