ATM theft from Patanaswangi 
विदर्भ

पाटणसावंगीमधून एटीएमची चोरी; कॅमेरे व रेकॉर्डरही पळून नेले 

सकाळ वृत्तसेवा

पाटणसावंगी, (जि. नागपूर) :   येथील "पाटको स्पिन' सूतगिरणीलगत असलेली इंडियन ओव्हरसिज बॅंकेचे एटीएम गुरुवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली. एटीएममधून सुमारे 2 लाख 83 हजार 600 रुपयांची रोकड चोरीला गेली असल्याची प्राथमिक माहिती पाटणसावंगी पोलिसांनी दिली आहे. 

सावनेर येथील बॅंकेचे व्यवस्थापक अंशुमन झा यांनी पाटणसावंगी पोलिस चौकीत याबाबतची तक्रार केली आहे. चोरट्यांनी एटीएम सेंटरमधील संपूर्ण मशीनच लंपास केली असल्याने दरोडेखोरांची मोठी टोळी यामागे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे पाटणसावंगी परिसरात खळबळ उडाली आहे. पाटणसावंगीतील सहाय्यक पोलिस निरीक्षक निशांत पुरेकर व इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने चोरीच्या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी भेट दिली. 

कॅमेरे, रेकॉर्डर पळवून नेले

त्यावेळी बॅंकेचे व्यवस्थापक अंशुमन झा, सुरक्षा अधिकारी अनुज कुमार, एटीएम मशीन ईपीएस कंपनीचे क्षेत्र अधिकारी जितेंद्र बसाखेत्रे उपस्थित होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचानामा करून तपास चालू केला. एटीएम मशीनच्या खोलीतील सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी तोडफोड केली. कॅमेरे, रेकॉर्डर पळवून नेले. यामुळे चोरटे कोण याचा शोध लावणे पोलिसांसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे. विशेष म्हणजे घटनास्थळ मुख्य रस्त्यावर आहे. चोरीची घटना पाटणसावंगी पोलिस स्टेशनपासून जवळच आहे. 

मशीन गाडीत भरून केला पोबारा

शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम सबलीने काढली. नंतर मशीन गाडीत भरून चोरांनी मशीनसह पोबारा केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असून तसे पुरावे मिळाले आहेत. संबंधित घटनेचा तपास पाटणसावंगी पोलिस संदीप नागरे, हेमराज कोल्हे व कुणाल कवडे करीत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराविरोधात बलूच मुलीची थेट भारताला साद; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Dapoli Tourism: सलग सुट्ट्यांचा फायदा; दापोली किनारपट्टीवर पर्यटकांची तुफान गर्दी, हर्णै मासळी बाजारातही उत्साह

Khamgaon Krushi Bazar Samiti: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस ११ लाखांचा हातभार

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT