file photo 
विदर्भ

जन्मदात्यानेच फासला नात्याला काळिमा...अल्पवयीन मुलीवर तिघांचा अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

वरुड (जि. अमरावती) : चार महिन्यांपासून वरुड ठाण्याच्या हद्दीत एका परिसरात अल्पवयीन मुलीवर (वय 14) जन्मदात्यासह तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यात पोलिसांनी पित्यासह दोघांना अटक केली असून, एक अद्याप फरार आहे. या घटनेची तक्रार पीडितेच्या नात्यातील महिलेने (वय 24) शुक्रवारी (ता. 26) वरुड पोलिसात केली.

प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या पित्यासह अन्य संशयित आरोपी शिवू सल्लू गुवाळे (वय 43) व बारकू ऊर्फ संजय ओंकार सिलू या तिघांविरुद्ध अत्याचार, जीवे मारण्याची धमकीसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यापैकी बारकू ऊर्फ संजय फरार आहे, असे पोलिस निरीक्षक मगन मेहते यांनी सांगितले.

वरुड परिसरातील अल्पवयीन मुलीवर (वय 14), तिच्या वडिलांचीच वाईट नजर गेली. पित्याकडून होत असलेल्या अत्याचाराबाबत ती कुणाकडेही बोलू शकत नव्हती. स्वत: वडीलच अत्याचार करीत असल्याचे कळताच त्याचा गैरफायदा शिवू व बारकू या दोघांनीही घेतला. त्या दोघांनीसुद्धा अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. मार्च 2020 पासून लैंगिक छळाचा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली.

तिघांनी दिली जीवे मारण्याची धमकी

घटनेची वाच्यता करू नये म्हणून पीडितेला तिघांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. पित्यासह तिघांकडून सुरू असलेला लैंगिक अत्याचार तिला असह्य झाला. त्यामुळे पीडितेने गावात राहणाऱ्या नात्यातील एका महिलेपुढे तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराची कहाणी विशद केली. लहान मुलीचा साडेतीन ते चार महिन्यांपासून सुरू असलेल्या लैंगिक अत्याचारामुळे नात्यातील महिलेस धक्का बसला. पीडितेची मनस्थिती सांभाळून धीर देत पोलिसांत तक्रार देण्यासाठी तयार केले.

"त्या' तिघांनी एकमेकास सांगितले नाही

जन्मदाताच चुकीच्या मार्गाने जात असल्याचा फायदा अन्य दोघांनी घेतला. एकाच मुलीवर अत्याचार करीत असल्याचे त्या तिघांनी एकमेकास कधी सांगितले नाही. फरार बारकूनेसुद्धा तीन ते चार वेळा अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तो मार्च महिन्यापासूनच फरार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तीन महिन्यांची गर्भवती
पीडिता ही तीन महिन्यांची गर्भवती आहे. तिची वैद्यकीय तपासणी केली गेली. पुढील कारवाईसाठी कायदेतज्ज्ञांचे मत घेण्यात येईल. अटकेतील दोघांना न्यायालयापुढे हजर केले.
- मगन मेहते, पोलिस निरीक्षक, वरुड ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायप्रक्रियेत मोठा बदल! आता खटला चालण्याआधीच निकाल? CJI Suryakant यांचा ‘मास्टर प्लॅन’ उघडकीस!

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा फिस्कटली, 'घड्याळा'वरून वाद; शरद पवारांचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : भाजपच्या संभाव्य यादीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; 'वर्षा'वर उद्या होणार बैठक

नवर्षात वाजणार झेडपी, पंचायत समित्यांचा बिगुल! पहिल्यांदा १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांची निवडणूक; २१ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असा असणार...

अग्रलेख - सतरंज्यांचा उठाव

SCROLL FOR NEXT