विदर्भ

वर्चस्व सहन न झाल्याने केली हत्या; चाकूने शरीरावर केले ४४ घाव

संतोष ताकपिरे

अमरावती : वर्चस्व सहन न झाल्यामुळे मित्रानेच मित्राची हत्या केल्याची (The friend killed the friend) बाब उघडकीस आली आहे. बडनेरा महामार्गावरील जंगलातील खुनाचे रहस्य गुन्हेशाखेच्या पोलिसांनी चोवीस तासांच्या आत उलगडले. (The mystery of the murder was revealed) या हत्याकांडात सहभागी पाच जणांना पोलिसांनी हिंगणघाट येथून अटक केली. रोहन ऊर्फ बच्चू वानखडे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Attack in Amravati and five people arrested)

आकाश दीपक मोरे (वय २६), करण कैलाश इटोरीया (वय २९), रोहित अमोल मांडळे (वय २०) तिघेही रा. राजापेठ, प्रशांत ऊर्फ सोनू लक्ष्मण चावरे (वय २९, रा बेलपुरा) व नीतेश नारायण पिवाल (वय २६, रा. कल्याणनगर) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. वनविभागाच्या जंगलात नेऊन रोहनचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न झाला होता. खून केल्यानंतर पाचही जण हिंगणघाट येथे निघून गेले होते.

आकाश मोरे याच्या मालकीचा एक प्लॉट होता. तो प्लॉट बच्चू वानखडे याने स्वत:च्या नावावर करून देण्यासाठी आकाशच्या मागे तगादा लावला होता. तीन महिन्यांपूर्वी आकाश व बच्चू या दोघांमध्ये याच मुद्यावरून भांडण झाले होते. रोहनचे वर्चव वाढत असल्याने आकाशच्या मनात भीती निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने स्वत:ची वेगळी गँग तयार केली. प्लॉट दाखविण्याच्या बहाण्याने आकाशने बच्चू याला आधी चौकात बोलावले. त्यानंतर गाडीवर बसवून नेले. ते परिसरातील हॉटेलमध्ये गेले. येथे त्यांच्यामध्ये वाद झाला.

बच्चूने त्यापैकी एकावर चाकू उगारला. त्यानंतर ही मंडळी बडनेरा हद्दीत माहार्गालगत आली. तेथे पाचही जणांनी बच्चूला जबर मारहाण केली. चाकूने त्याच्या शरीरावर ४४ घाव केले. त्यानंतर मृतदेह शंभरफूट दूर जंगलात नेऊन पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला व फरार झाले. अटकेतील दोघांना बडनेरा पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. या संशयित आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आकाश, नीतेश गांजातस्करीत सहभागी

महामार्गावर खूनप्रकरणातील आकाश व साथीदार नीतेश हे दोघे गांजातस्करीत अटक झाले होते. तेव्हापासून ते जवळपास दोन ते अडीचवर्षे कारागृहात होते. नोव्हेंबर २०२० मध्ये दोघेही कारागृहातून बाहेर आले. त्यानंतर पुन्हा वर्चस्वाची लढाई सुरू झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

(Attack in Amravati and five people arrested)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT