murder murder
विदर्भ

रात्री ३ वाजता आला दरवाजाचा आवाज; दार उघडताच वृद्धाचा केला खून

सकाळ वृत्तसेवा

आरमोरी (जि. गडचिरोली) : अज्ञात व्यक्तीने वृद्ध दाम्पत्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून खून केल्याची घटना आरमोरी येथील तहसील कार्यालयासमोरील वस्तीत सोमवारी (ता. २२) रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी आहे. आरमोरी येथील रहिवासी गौतम ऋषी निमगडे (वय ६३) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी माया गौतम निमगडे (वय ६०) गंभीर जखमी आहेत. घटनेची तक्रार आरमोरी पोलिसांत करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, गौतम निमगडे व पत्नी माया घरी झोपले असताना रात्री २ ते ३ वाजतादरम्यान अज्ञात व्यक्तीने दार वाजवले. गौतम निमगडे यांनी दरवाजा उघडला असता क्षणाचाही विलंब न लावता हातात असलेल्या शस्त्राने वृद्ध दाम्पत्याच्या डोक्यावर सपासप वार करून हल्लेखोर पळून गेले. जखमी अवस्थेत असलेल्या दाम्पत्यांनी हल्ला झाल्याची माहिती तळमजल्यावर राहत असलेल्या मुलाला दिली. मुलाने आरडाओरड करीत आई-वडिलांना आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान गौतम निमगडे यांचा मृत्यू झाला.

गंभीर जखमी माया गौतम निमगडे यांना ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. घटनेची तक्रार आरमोरी पोलिस ठाण्यात झाली असून, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले असून, घटनास्थळाचा पंचनामा करून फिंगर प्रिंट घेण्यात आले. पोलिस उपविभागीय अधिकारी प्राणील गिल्डा यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पंकज बोडसे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुस्त सुरुवात; सेंसेक्स 70 अंकांनी वर, कोणते शेअर्स वाढले?

Pune Research Students Protest: संशोधक विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; योजनांकडे दुर्लक्ष केल्याचा राज्य सरकारवर आरोप, तीव्र असंतोष

Minister Bharat Gogawale:'मंत्री भरत गोगावलेंनी फुंकले महापालिका निवडणुकीचे बिगुल'; विकासकामांचे लोकार्पण; रॅलीद्वारे नागरिकांशी साधला संवाद

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

SCROLL FOR NEXT