Attempted rape of a minor girl, accused arrested
Attempted rape of a minor girl, accused arrested 
विदर्भ

गावी सोडून देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवले आणि...

सकाळ वृत्तसेवा

देवळी (जि. वर्धा) : गावाला सोडून देण्याच्या बहाण्याने गावातील दोन युवकांनी एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही आरोपींच्या हाताला चावा घेऊन मुलीने पळ काढला. मोबाईलने गावात संपर्क साधत तिने मदत मागितल्याने या युवकांच्या तावडीतून तिची सुटका झाली. ही घटना बुधवारी (ता. 16) घडली.

अंदोरी येथे राहणारी अल्पवयीन मुलगी देवळी येथे शिकत होती. तिच्या आईचा मोबाईल बंद असल्याने त्याच्या दुरुस्तीकरिता ती देवळी येथे आली. मोबाईल दुरुस्तीचे काम झाल्यानंतर गावी परत जाण्याकरिता बसस्थानकावर ती उभी होती. दरम्यान, गावातील सूरज शंकर कोरचे (वय 23) व प्रशांत गजानन भोयर (वय 21) हे दोघे दुचाकीने बसस्थानकावर आले. तिथे आम्ही अंदोरीला चाललो असे म्हणत तिला सोडून देण्याचे म्हटले. दोघेही युवक गावातील असल्याने तिने होकार दिला.

तिघेही गावाकडे निघाले असताना शिंगरवाडी गावालगत पुलाजवळ दुचाकी थांबवून या दोघांनी तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरोपीच्या हाताचा चावा घेत पळ काढला आणि थेट शिंगरवाडी बसस्थानक गाठत गावात संपर्क केला. ही माहिती सरपंच जयकुमार वाकडे यांना मिळताच ते शिंगरवाडीला पोहोचले. येथून या मुलीला घेत त्यांनी पोलिस ठाणे गाठले. येथे या युवकांविरुद्ध तक्रार दाखल केली. दोन्ही युवकांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. अल्पवयीन मुली आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT