File photo 
विदर्भ

"त्या' आवाजाला दैवी चमत्काराशी जोडण्याचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

आंबोली (चंद्रपूर) : शंकरपुर मार्गावरील पुयारदंड गावातील बाबा पिचकाते यांच्या शेतातील चिंचेच्या झाडातून पाण्याचा आवाज येत आहे. याला दैवी चमत्कारशी जोडण्याचा प्रयत्न काही जणांनी सुरू केला आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यात लक्ष घालावे, अशी मागणी पुढे आली आहे.
चिंचेच्या झाडाखाली मातेच्या दगर्ङी मुर्त्या आहे. चिंचेच्या बुंध्यातून दोन वेगवेगळी आवाज येत आहे. दोन्ही ठिकाणी पाणी निरंतर वाहत असल्याचे आवाजावरून दिसून येते. हा प्रकार बघण्यासाठी मोठ्या संख्येत नागरिक येथे येत आहे. शेतमालक मातेचा कोप असल्याचे समजून रोज पूजा-अर्चा करीत आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत या शेतात 13 बोअरवेल्स खोदण्यात आल्या. परंतु एकालाही पाणी लागले नाही. आषाढी एकादशी पासून आवाज येणे सुरू झाले. त्यामुळे काही जणांनी याला दैवी चमत्काराशी जोडणे सुरू केले आहे. मात्र यामागे काही वैज्ञानिक कारण असावे, असे वाटणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. एखादा भूगर्भशास्त्रज्ञ यामागचे गुढ उकलू शकेल, असे त्यांना वाटते. सोबत गावकऱ्यांची मनातील भीती दूर करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूूलन समितीने पुढाकार घ्यावा, अशीही मागणी होत आहे.

झाडाच्या पोकळीत पाणी
पाण्याचा बुळबुळ असा आवाज येतो आहे. याचा अर्थ पाणी वरुण खाली जात आहे. वाहत असताना झाडाच्या मुळे या प्रवाहात आलेली आहे. चिंचेचे झाड आतून बहुतेक वेळा पोकळ असते. त्या पोकळी मध्ये खाली पाणी पडत आहे. बुंध्यामधे आणि झाडा खालीपण काही मीटर खोली रहू शकते. त्या ठिकाणी थोडे थोडे पाणी पडत असल्यामुळे असा आवाज येत आहे. .पाण्याच्या प्रवाहात झाड आल्यामुळे झाडाच्या मुळांनी केंद्राकडे पाण्याला आकर्षित केले आहे. दोन वेगवेगळे आवाज येण्याचे कारण म्हणजे आकार आणि त्याला खाली मिळालेली पोकळी.
झाडाच्या जवळपास असलेली विहिरीचे पाणी आणि चिंचेच्या झाडातून वाहत असलेले पाणी यांचे झरे तपासले की आपली संकल्पना स्पष्ट होईल, असे भूगर्भ अभ्यासक डॉ.योगेश दुधपचारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ‘ऑपरेशन टायगर’ची भीती? उद्धव ठाकरेंची खासदारांसोबत तातडीची बैठक; पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

Aadhaar App Preload : "ही जबरदस्ती कशासाठी?" नवीन मोबाईलमध्ये आधार ॲप सक्तीचे; पण ॲपल-सॅमसंगचा सरकारला विरोध का? जाणून घ्या

Shalarth ID Scam : शिक्षण क्षेत्रात खळबळ! ३ लाख शिक्षकांच्या शालार्थ आयडीची एसआयटी चौकशी सुरू

Kamakhya Temple Controversy : नाशिकमध्ये 55 कोटींचं साम्राज्य! कोण आहे हा 'बडे बाबा'? ज्याच्या कामाख्या मंदिरावर 'अंनिस'ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

नाना पाटेकरांनी स्वत:च्या हाताने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'माझ्यासाठी त्यांनी...' Viral Video

SCROLL FOR NEXT