file photo 
विदर्भ

शुद्ध श्‍वासाचा निर्माताच सापडला संकटात, शेकडो वर्षे जुना वटवृक्ष जाळून पाडण्याचा प्रयत्न

मंगेश पारटकर

शेंबाळपिंपरी (जि. यवतमाळ) : शुद्ध हवेचा निरंतर पुरवठा करून मानवी जीवन समृद्ध करणाऱ्यांच्या नशिबी आता मानवी संकटामुळे श्‍वास घेणेच अवघड झाले आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करून चिपको आंदोलन करण्याची गावकऱ्यांनी तयारी केली आहे. या आशयाचे निवेदन गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.

पुसद तालुक्‍यातील गौळ बुद्रूक गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक असलेल्या बाबा ओश परिसरात शेकडो वर्षे जुना वटवृक्ष आहे. या झाडावर वेगवेगळ्या पक्ष्यांचा अधिवास आहे. गावाच्या अनेक घटना व आठवणीचे प्रतीक असलेला हा वटवृक्ष अनेक वर्षांपासून गावकऱ्यांचा श्‍वास जतन करीत आहे.

नागपंचमीनिमित्त लेकीबाळींनी घेतलेले मोठ्या झोक्‍यांशिवाय सुहासिनी महिलांनी सातजन्म हाच पती मिळावा म्हणून केलेली मनोभावे पूजा, असे कितीतरी धार्मिक विधींमुळे हा वटवृक्ष गावकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. पण मागील काही दिवसांपासून या वटवृक्षाच्या खोडाला जाळ करून पेटवून देऊन पाडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायत या बाबीकडे गांभीर्याने पाहत नसल्याने असा प्रकार करणाऱ्यांची हिंमत वाढली आहे. जिल्हाधिकारी यांनी या प्रकाराकडे लक्ष पुरवून वृक्षाचे रक्षण करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

अन्यथा चिपको आंदोलन करू

सह्याद्री देवराईचे सयाजी शिंदे यांनाही गावकऱ्यांनी या वृक्ष संरक्षणासाठी हाक दिली आहे. ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार होत असल्याचा आरोप करीत धार्मिक महत्त्व असलेल्या आणि श्‍वास जतन करणाऱ्या वटवृक्षाचे जतन करून दोषींना समज द्यावी, अन्यथा आम्ही चिपको आंदोलन करू, असा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण आणि ग्रामीण जनतेच्या भावना जुडलेल्या विषयाबाबत संबंधित लोकप्रतिनिधीही दुर्लक्षित भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. यावर प्रशासन काय कारवाई करते, याकडे गावातीलच नव्हे तर तालुक्‍यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

वटवृक्षाचे संवर्धन करू
सदर प्रकार हा निसर्ग व पर्यावरणाची हानी करणारा आहे. या बाबत मी उपविभागीय अधिकारी यांना माहिती घेण्यासाठी सांगितले. गावकऱ्यांशी चर्चा करून या वटवृक्षाचे संवर्धन करण्यात येईल.
- एम. डी. सिंग,
जिल्हाधिकारी, यवतमाळ

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

Kolhapur Police Recruitment : कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा उद्या; ८८ पदांसाठी ११३५ उमेदवार मैदानात

Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ९ वर्षांच्या मुलासमोर घडली धक्कादायक घटना

Kolhapur Water Project : ‘धामणी’चे अतिरिक्त पाणी करवीर तालुक्याला द्यावे; तर, कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय हवे - नरके

SCROLL FOR NEXT