File photo 
विदर्भ

झोपेच्या गोळ्या देऊन भाचीवर मामाचा अत्याचाराचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अनाथ असलेल्या 16 वर्षीय भाचीला झोपेच्या गोळ्या चारून दोन नराधम मामांनी अत्याचाराचा प्रयत्न केला. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून दोन्ही मामांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीचे मामा नागपुरातील तहसील हद्दीत राहतात. ती 11 वर्षांची असताना वडील अपघातात मरण पावले; तर आई आजारपणामुळे मरण पावली. त्यामुळे ती मोमीनपुऱ्यात मोठ्या मामांकडे राहत होती. नवव्या वर्गापर्यंत तिने शिक्षण घेतले. मामी तिला घरकाम करण्यासाठी त्रास देत होती; तर मामा नेहमी तिच्याशी अश्‍लील चाळे करीत होते. मात्र, अनाथासारखी स्थिती असल्यामुळे ती मामाचा अत्याचार सहन करीत होती. 6 जानेवारी 2015 ला पहिल्यांदा तिला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून तिच्याशी मामाने अश्‍लील चाळे केले. तेव्हापासून मामाचा शारीरिक त्रास नेहमीचाच सुरू झाला. त्यामुळे तिने कंटाळून दुसऱ्या मामाकडे जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या मामाने तिला काही दिवस घरी ठेवले. त्यानंतर तिच्याशी अश्‍लील चाळे करायला लागला. दोन्ही घरी सारखाच त्रास होत असल्यामुळे ती मनाने खचून गेली होती. त्यामुळे तिने एका नगरसेविकेला आपबिती सांगून मदत मागितली. नगरसेविकेने तिला तहसीलचे ठाणेदार अजयकुमार मालवीय यांच्याकडे नेले. त्यांनी मुलीची चौकशी केली. मामांनी अत्याचार केल्याचे लक्षात आले. त्यामुळे दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT