गोळीबार चौक : अंगाला झाडांची पाने गुंडाळून तांडव आंदोलनात सहभागी झालेले हलबा समाजातील युवक.
गोळीबार चौक : अंगाला झाडांची पाने गुंडाळून तांडव आंदोलनात सहभागी झालेले हलबा समाजातील युवक.  
विदर्भ

हलबा समाजा तांडव आंदोलनाद्वारे वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : निवडणुकीदरम्यान सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ हलबा समाजाने रविवारी गोळीबार चौकात तांडव आंदोलन करीत आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधून घेतले. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्याचा इशारासुद्धा आंदोलकांनी दिला.
हलबा क्रांती सेनेतर्फे आमदार विकास कुंभारे यांचे जनसंपर्क कार्यालय असलेल्या चौकातच आदिवासींच्या वेशात आंदोलन करण्यात आले. अंगाला पाने गुंडाळून युवकांनी सादर केलेले पारंपरिक दंडार नृत्य आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले. हलबा एकता जिंदाबाद, गर्वसे कहो हम आदिवासी हैं, भारत के मूल निवासी है, केंद्र सरकार होश में आओ, राज्य सरकार होश में आओ, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी आंदोलक युवकांनी त्यांच्या दैवतांचीही आठवण करीत सरकारला सद्‌बुद्धी देण्याची प्रार्थना केली. आता अन्याय सहन करणार नाही, असा निर्धार या आंदोलनातून करण्यात आला.
हलबा समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक, राहणीमान, भाषा, वेशभूषेची ऐतिहासिक कागदपत्रे शासनाने संकलित करावी, खऱ्या हलबांना न्याय द्यावा. अन्यथा येणाऱ्या दिवसांमध्ये तीव्र आंदोलनाला समोरे जावे लागेल, असा इशारा आंदोलकांनी दिला. हलबा क्रांती सेनेचे संस्थापक जगदीश खापेकर, उपाध्यक्ष कमलेश भगतकर यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात विजय मौंदेकर, सुशील कोहाड, दीपक उमरेडकर, अश्‍विन अंजिकर, दीपक उमरेडकर, प्रदीप पौनिकर, शुभम पौनिकर, शुभम पौनिकर, संदीप चिचघरे, सचिन काटले, राज भुरडे, जितेंद्र वेडेकर, शिवशंकर रणदिवे, दुर्गेश हिंगणेकर, पंकेश निमजे, प्रमोद गडीकर आदींचा सहभाग होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT