SYSTEM
SYSTEM
विदर्भ

‘श्रीकृष्ण’ राहतात आयुर्वेदिक वेलींच्या छायेत

विवेक राऊत

चांदूररेल्वे (जि. अमरावती) : जगात विविध छंद जोपासणारे अनेक जण पाहिले आहेत. त्यातीलच आपल्या गुरूंनी दिलेला आयुर्वेदाचा वारसा जपणारे एक अफलातून व्यक्तिमत्त्व तालुक्यातील नया सावंगा येथे पाहावयास मिळते. त्यांच्या घराला आयुर्वेदिक व गुणकारी वेलींनी वेढले आहे. आयुर्वेदिक वनस्पतींची ते आपल्या प्राणासारखे संवर्धन करतात. श्रीकृष्ण नारायण भलावी, असे या व्यक्तिमत्त्वाचे नाव.

गुळवेल, धोत्रा, तुळस, सब्जा, सतावरी, वासनवेल, लाजवंती, पांढरेगुंज, समुद्रशेष, जठाशंकर, हाडजोड, श्वेत अपराजिता, पर्णकुटी यासारख्या असंख्य आयुर्वेद वनस्पती भलावी यांनी आपल्या अंगणात लावल्या व त्यांचे जतन केले. त्यांच्या घरात लागलेल्या समुद्रशेष या वेलाने तर घराला आच्छादन केले आहे.

या छंदाविषयी त्यांनी सांगितले, त्यांचे गुरू पागलदास बाबा यांचा वारसा ते सांभाळत आहेत. अमरावती मार्गावर पोहरा ते चिरोडीच्या मधात पागलदास महाराज यांचा आश्रम आहे. महाराजांना आयुर्वेदाचे ज्ञान होते. ते अनेक आजारांवर गुणकारी औषधे देत. त्यांच्यानंतर सेवाभावाने श्रीकृष्ण भलावी यांनी त्यांचा वारसा जपण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पतींमध्ये स्वतःचे जीवन वाहिल्याचे त्यांनी सांगितले.

कुटुंब करते वनस्पतींचे संवर्धन

उदरनिर्वाह म्हणून शेती आणि दर शनिवारी, मंगळवारी ते मंदिरात येणाऱ्या रुग्णांना आयुर्वेदिक औषधे देतात. त्यांनी त्यांच्या घराच्या आवारात अशा गुणकारी वनस्पतींचे छोटे जंगलच उभे केले. त्यांचे कुटुंब या वनस्पतींचे संवर्धन करतात. नुकतेच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी त्यांच्या घरी भेट देऊन वृक्षप्रेमाची प्रशंसा केली.

घरातील अनेक वनस्पती या बहुगुणकारी आहेत. सात वर्षांपासून महाराजांपासून प्रेरणा घेत या कार्याला सुरुवात केली. फिरताना जिथे जिथे वेगवेगळ्या वनस्पती दिसतात, तेथून त्या घेऊन घरी आणून त्यांचे जतन करतो. बहुगुणकारी तुळशीची चारशे झाडे मी या परिसरात लावली आहेत. अजूनही अभ्यास सुरू आहे. रुग्णांची सेवा हेच आपले समाधान आहे.
- श्रीकृष्ण भलावी, नया सावंगा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: देशातील 'या' राज्यात होत आहे सर्वाधिक मतदान, वाचा दुपारी 1 पर्यंतची आकडेवारी

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT