f8afd01a-2ca8-4ab7-a906-80069f923373.jpg 
विदर्भ

बाळा मी लवकरच येईल...

भगवान वानखेडे

अकोला ः पोलिस कर्मचाऱ्यांची ड्युटी आधीच धावपळीची. त्यात कोरोनाचे संकट आले आणि ड्युटीच्या वेळा आणि जबाबदारी वाढलेली. अशा स्थितीत सव्वा दोन वर्षाच्या प्रत्युषला आजीकडे सोडून पोलिस उपनिरीक्षक सरिता कुवारे-सोळंके या कर्तव्यावर हजर आहेत. वेळ मिळेल तसा व्हिडिओ कॉल करायचा. मुलाला सारखे आईला पाहायचे असते. मात्र, ‘बाळा मी लवकरच येईल. तुझ्यासोबत खेळायला’, अशा शब्दांत त्याची समजूत काढत सरिता कुवारे -सोळंके या रस्त्यावर कधी दिवसा, तर कधी रात्री डोळ्यात तेल घालून कर्तव्य निभावत आहेत.

सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सरिता कुवारे- सोळंके या अकोल्यात त्यांचे पती सिव्हिल लाईन्सचे पोलिस कॉन्स्टेबल सचिन सोळंके यांचा सोबत आहेत. दोघेही पोलिस खात्यात असल्याने धावपळ ही होणारच. या दांपत्याला प्रत्युष हा सव्वा दोन वर्षाचा मुलगा. पती-पत्नी दोघेही अत्यावश्यक सेवेत कार्यरत असल्याने कोरोनाच्या काळातही त्यांना आपले कर्तव्य निभवावे लागते. अशा स्थितीत प्रथम त्यांना प्रत्यूषची काळजी घेताना अडचणींना सामोरे जावे लागले. अखेर कुवारे यांच्या आईने बाळाला सांभाळण्याची जबाबदारी घेतली. अन् कुवारे यांनी यांनी मोकळ्या मनाने कर्तव्यासाठी झोकून दिले.

कधी दिवसा, कधी रात्री डोळ्यांत तेल घालून निभावत आहेत कर्तव्य
जिल्ह्याची सीमा बंद असल्याने या ठिकाणाहून जाणाऱ्या अत्यावश्यक सेवा वाहनांची त्यांची योग्य ती खात्री करण्याची व तपासणीची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पोलिस निभावतात. अनेकदा 12 तासांहून अधिक वेळ ड्युटी होते. मात्र, कोरोनाला जिल्ह्याच्या हद्दीत येऊ द्यायचे नसल्याने पोलिस हे सहकाऱ्यांसह दक्ष असतात. दोन दिवस नाईट, तर दोन दिवस डे अशी ड्युटी सध्या पोलिस करीत आहेत. यांना अनेकदा मुलाला, कुटुंबीयांना बोलायला वेळ मिळत नाही. तुझ्याशी खेळायला येईल, अशी समजूत चिमुकल्याची काढताना थोडे वाईट वाटते, पण देशसेवा घडते याचे समाधान असल्याची भावना सरिता कुवारे यांनी व्यक्त केली.

कधी-कधी रडून झोपी गेलेला असतो
प्रत्युष आपल्या आजीजवळ राहतो खरा मात्र आईची आठवण झाली की, रडायला सुरू करतो. अशा वेळी त्याची आजी कुवारे यांना मेसेज करतात व त्या त्यांची ड्यूटी संपल्यानंतर व्हिडिओ कॉल वरून बाळाशी गप्पा मारतात. मात्र, अनेकदा तो रडून झोपीही गेलेला असतो.

आम्ही आमच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेतो आहोत, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही कुटुंब, चिमुकल्यांना दूर ठेवून कर्तव्य बजावत आहोत. त्यामुळे सर्वांनी घरी थांबून सहकार्य करावे.
- सरिता कुवारे-सोळंके , पोलिस उपनिरीक्षक,अकोला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT