bacchu kadu.jpg 
विदर्भ

म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू ‘होम क्वारंटाईन’

शुभम बायस्कार

अकोला : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना वेळोवेळी आवाहन करून काळजी घेण्याची सूचना देणारे अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडूच कोरोनाचे संशयास्पद असल्याचे बोलले जात होते. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आपली कोरोनाची तपासणी करून घेतली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, तरीही त्यांनी अमरावती येथील निवासस्थानी स्वतःला 10 दिवसासाठी ‘होम क्वारंटाईन’ करून घेत सर्वांनी काळाजी घेण्याचे आवाहन केले आहे.

गत काही दिवसांपूर्वी पालकमंत्री बच्चू कडू यांना ताप व खोकला असल्याने त्यांनी 26 मार्चला कोरोनाची चाचणी करून घेतली होती. तसेच संशयित असल्याने त्यांनी अमरावतीत आपल्या निवासस्थानी स्वतःला होम क्वारंटाईन करून ठेवले होते. त्यानंतर बच्चू कडू यांचा कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्याने त्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. बच्चू कडू हे संशयास्पद असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राज्यात सुरू आहे. 

त्यानिमित्ताने बच्चू कडू हे मदत आणि इतर कामांसाठी सातत्याने लोकांच्या संपर्कात येत होते. तसेच त्यांनी नुकतीच येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात जिल्हा प्रशासनाच्या कोरोना नियोजनाबाबत आढावा बैठक घेतली होती. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण यांच्यासह अन्य यावेळी उपस्थित होते. त्यानंतर त्यांच्या अचलपूर मतदारसंघातही त्यांच्याकडून नागरिकांना मदत केली जात आहे. अशातच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता. 

अहवाल आला निगेटिव्ह
त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र, तरीही त्यांनी स्वतःला 10 दिवसासाठी ‘होम क्वारंटाईन’ करून घेतले आहे. तसेच कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये, चिंता करू नये तसेच स्वतःची काळजी घ्या, घराबाहेर पडू नका, असे आवाहनही बच्चू कडू यांनी केले आहे. यासंदर्भात अमरावतीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्‍यामसुंदर निकम यांना विचारले असता, त्यांनीही अहवाल निगेटिव्ह आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwajeet Kadam Helicopter : कार्यकर्ता जपावा तर असा! वेळेअभावी आमदार विश्वजीत कदम थेट हेलिकॉप्टरने वास्तुशांतीला; गावात हेलिकॉप्टर येताच जल्लोष

Solapur Farmers: लिंकिंगच्या सक्तीमुळे आर्थिक लूट! युरियाचे २६६ रुपयांचे पोते ३५० ला; शेतकऱ्यांतून संताप व्यक्त

कोरोना लसीमुळे कॅन्सर अन् हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय? नाना पटोलेंच्या दाव्यात किती तथ्य; खरं काय जाणून घ्या

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT