bacchu kadu.jpg
bacchu kadu.jpg 
विदर्भ

बच्चू कडूंचे ‘वर्क फ्रॉम होम’; घरूनच असा चालतो कारभार...वाचा 

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अपना भिडू बच्चू कडू, या टॅगलाइनने सर्वत्र लोकप्रिय झालेले राज्यमंत्री बच्चू कडू हे त्यांच्या कामाच्या आगळ्यावेगळ्या शैलीनेही तेवढेच लोकप्रिय आहेत. नेहमी माणसांच्या गर्दीत  असणारा माणूस बच्चू कडू सध्या मात्र ‘वर्क फ्रॉम होम’ करतोय. अकोल्याचे पालकमंत्री असूनही होम क्वॉरंटाइन असल्याने त्यांचा संपूर्ण वेळ कुटुंबासोबत चालला असला तरी ते प्रशासनाच्या टचमध्येही कायम आहेत.

राज्यमंत्री व अकोला जिल्हा पालकमंत्री बच्चू कडू यांची कोरोना संशयावरून चाचणी करण्यात आली होती. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली असली तरी त्यानंतर ते होम क्वॉरंटाइन झाले होते. तेव्हापासून त्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू केले आहे. फोनवरून ते मतदारसंघासोबतच पालकत्व असलेल्या अकोला जिल्ह्यातील प्रशासनासोबतही कायम संपर्कात असतात. त्यांच्या ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कोणतेही महत्त्वाचे काम आतापर्यंत अडून बसले नाही. मात्र, जिल्ह्यात संकटाच्या काळात त्यांची उपस्थिती नसल्याने नागरिकांमध्ये कुरबूर सुरू झाली आहे.

अशी होते दिवसाची सुरुवात
पालमकंत्री बच्चू कडू यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू केल्यानंतर त्यांच्या दिवसाची सुरुवात सूर्यनमस्कार काढण्यापासून सुरू होते. स्वतःचा चहा स्वतः तयार करून घेणे, पुस्तक वाचने, मतदारसंघातील, पालकत्व असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांना फोनवरून प्रशासनाला सूचना देत सोडवून घेण्यात त्यांचा दिवस जातो. यावेळेत ते स्वतः घराच्या परसबागेत काम करतात. झाडांना पाणी देणे, फावडे हातात घेवून आळे करणे यासारखी कामेही ते करतात.

कुटुंबातील सदस्यांना आनंद
सतत माणसांच्या गराळ्यात राहणार नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत झटणारे बच्चू भाऊ कुटुंबाला त्या माणाने फारच कमी वेळ देतात. सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असल्याने ते कुटुंबालाही जास्त वेळ देवू शकत आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत बुद्धिबळ, लगोरीसारखे खेळ खेळून ते वेळ घालवत आहेत. मात्र घरात अटकून पडल्याने मतदारसंघ व पालकत्व असलेल्या जिल्ह्यात प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्यास मिळत नसल्याची घालमेल त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत असल्याचे वहिनीसाहेब सांगतात.

सर्व मिळून या संकटावर मात करू
कोरोना विषाणूचा संसर्ग हे मोठे संकट आहे. या संकटावर सर्व मिळून मात करू. हे दिवसही निघून जातील. पुन्हा नव्या दमाने कामाला लागू. सर्वांनी स्वतःची काळजी घेत पुढील काही दिवस दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी नागरिक व जिल्हा प्रशासनाला केले आहे. अकोला येथील जिल्हा प्रशासनाच्या कामाबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले. पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT