File photo
File photo 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 वंचित व बसप विधानसभेत वंचितच

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : लोकसभेत जन्माला आलेली वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीत "वंचितच' असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. तर, कॅडरबेस बहुजन समाज पक्षाच्या हत्तीला अद्यापही चाल मिळालेली नाही. मोठ्या प्रमाणावर मतविभाजन करण्याची शक्ती व जय-पराजयास कारणीभूत ठरण्याची भूमिका बजावण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असतानाच विधानसभा निवडणुकीत मात्र तसे चित्र दिसत नाही.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गाजावाजा करीत वंचितचा जन्म झाला. राज्यात या पक्षाने लोकसभा निवडणुकीत मतविभाजनाची मोठी भूमिका निभावली व अनेकांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. तीच भूमिका विधानसभा निवडणुकीतही राहील असा दावा केला जात होता. फटका बसू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवर आघाडीसाठी चर्चाही झाली. ती फलद्रूप झाली नाही. अखेर या पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा करीत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली.
अमरावती जिल्ह्यातील अमरावती, बडनेरा, दर्यापूर, तिवसा, धामणगावरेल्वे, अचलपूर या सहा मतदारसंघात वंचितचे उमेदवार रिंगणात आले. त्यांच्या समर्थनार्थ पक्षप्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांची वलगाव येथे जाहीर सभा झाली. आता सहाही उमेदवार स्वभरोसे आहेत. त्यांचा मतदारसंघात प्रचार सुरू आहे. मात्र, लोकसभेत प्रारंभी असलेला जोश विधानसभा निवडणुकीत दिसत नाही. मोर्शी मतदारसंघात उमेदवाराने माघार घेतली, तर मेळघाटमध्ये उमेदवारच समोर आला नाही. प्रचारासाठी साहित्य जमवताना उमेदवाराची दमछाक होत असतानाच कार्यकर्त्यांची संख्याही मर्यादित असल्याने धाप लागू लागली आहे.
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात या पक्षाने सुरुवातीला चांगली हवा निर्माण केली होती. मात्र, नंतर ती कमी होत गेली व अखेरच्या टप्प्यात विरली. जिल्ह्याच्या बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट व अचलपूर या सहा विधानसभा मतदारसंघात या पक्षाच्या उमेदवारास 5.84 टक्के मते मिळाली. सर्वाधिक मते तिवस्यात 15 हजार 68 व दर्यापुरात 14 हजार 725 मते होती. तर, मेळघाटात फक्त 3,040 मते मिळू शकली. मेळघाटमध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारच नाही. बडनेरा, धामणगावरेल्वे वगळता उर्वरित मतदारसंघात या पक्षाच्या उमेदवारांना प्रचारात सूर गवसू शकला नसल्याने ते वंचितच ठरू लागले आहेत.
कॅडरबेस बहुजन समाज पक्षाचीही हवा कुठेही जाणवत नसल्याचे चित्र आहे. या पक्षाला लोकसभा निवडणुकीत 1.10 टक्के मते मिळाली होती. यावेळी त्यांचे आठही मतदारसंघात उमेदवार रिंगणात आहेत. अमरावती व तिवसा वगळता उर्वरित मतदारसंघात या पक्षाच्या उमेदवारास तीन हजाराचाही आकडा पार करता आला नाही. मतविभाजनात मोठी भूमिका निभावू शकणाऱ्या या दोन्ही पक्षांची विद्यमान स्थिती मात्र वंचित झाली आहे, असे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT