crime sakal
विदर्भ

Balapur : कत्तलीसाठी गोवंशांची तस्करी करणारा तरुण गजाआड; आठ गोवंश ताब्यात, वाडेगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वाडेगाव येथील इंदिरा नगर झोपडपट्टीतील एका तरुणाने गोवंश जातीचे जनावरे चोरून आणून

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर - शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरे चोरून त्यांना कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवणाऱ्या चोरट्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या प्रकरणी वाडेगाव येथील एका २२ वर्षीय तरुणाला पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सदर तरुणा विरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरट्या कडून २ लाख ४० हजार रुपये किमतीची जनावरे व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

वाडेगाव येथील इंदिरा नगर झोपडपट्टीतील एका तरुणाने गोवंश जातीचे जनावरे चोरून आणून त्यांना कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांना मिळाली. या माहितीवरून पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या निर्देशानुसार पोलीसांनी आज रविवारी (ता. २२ रोजी) वाडेगाव येथील इंदिरा नगर झोपडपट्टीत जनावरे चोरी करणाऱ्या तरुणाचा शोध घेतला असता त्यांना मोहम्मद असद मोहम्मद अशरफ वय (२२ वर्ष) याच्या घरी जनावरे बांधलेली आढळून आली.

हि कारवाई पोलीस अधिक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पो.उप.नि. गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक गोपीलाल मावळे, ए.एस.आय. दशरथ बोरकर, पोलीस हवालदार फिरोज खान, गोकुळ चव्हाण, प्रमोद ढोरे, प्रमोद डोईफोडे, भास्कर धोत्रे, उमेश पराये महिला पोलीस हवालदार तुळसा दुबे, ना.पो.कॉ. खुशाल नेमाडे, पो. कॉ. लिलाधर खंडारे, अन्सार अहमद, स्वप्नील खेडकर, स्वप्नील चौधरी, शिवम दुबे, धिरज वानखडे, उदय शुक्ला, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, सतिश पवार महिला पो. कॉ. तृष्णा घुमन व चालक ना. पो. कॉ. शेख नफीस पो. कॉ. अनिल राठोड, अक्षय बोबडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT