balasaheb patil opinion important for jamod constituency 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 : बाळासाहेब पाटलांच्या भूमिकेवर मतदारसंघाचे चित्र

आशिष ठाकरे

बुलडाणा : पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या सोबत दोन पंचवार्षिक लढा देणारे बाळासाहेब उर्फ प्रसेनजीत पाटील यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तथापि, कॉग्रेसची उमेदवारी डॉ. स्वाती संदीप वाकेकर व कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांची भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारीनंतर आज (ता. 2) भूमिका स्पष्ट करणार आहे.

घाटा खालील राजकारण हा जिल्ह्यातील राजकारणाचा एक अभिभाज्य घटक समजला जातो. त्यातही जळगाव जामोद मतदार संघाला विशेष महत्त्व आहे. मतदार संघ सध्या भाजप चा गड झाला आहे तो भेडण्यासाठी कॉग्रेसने विडा उचलला आहे. दरम्यान, मतदार संघातील निवडणुकीत जातीय समिकरणावर सर्व नियोजन करण्यात येते. त्यानुसारच मतदार संघात डॉ. संजय कुटे यांचा विकास पर्व थांबविण्यासाठी कॉग्रेसकडून माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या सुपुत्रि डॉ. स्वाती वाकेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, दोनवेळा विजयला घुलकावणी बसलेले तत्कालीन भारिप बहुजन उमेदवार बाळासाहेब उर्फ प्रसेनजित पाटील यांनी कॉग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर फेसबुक या सोशल मीडियावर त्यांची भूमिका मांडण्याचे जाहीर केल्यामुळे येथील राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. ते आज (ता. 2) महात्मा गांधी जयंती मुहूर्तावर संध्याकाळी 4 वाजता जिंनिग प्रेसिंगमध्ये बोलणार आहे. त्यांच्या या भूमिकेसाठी समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

महात्मा गांधी जयंती दिनी प्रसेनजित पाटील इतर पक्षाचा झेंडा घेत कॉग्रेसला सोडचिट्ठी देतात की शांत राहत पक्षकार्य करतात याकडे मतदार संघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. तर, कॉग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली की त्यांनी कॉग्रेस उमेदवारी नाकारली हे कोडे असून त्याचाही उलगडा होणार आज होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT