file photo 
विदर्भ

चंद्रपुरातील बांबूच्या राखीला आता देशात मागणी; सहा हजारांवर राख्यांची विक्री 

साईनाथ सोनटक्के

चंद्रपूर : बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. कुटुंबीयांनी योग्य वर बघून विवाह लावून दिला. संसारात रममाण झाली. संसारवेलीवर एक फूलही उमलले. चार भिंतीत जीवन जगण्यापेक्षा शिक्षणाचा फायदा व्हावा म्हणून काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. बांबूपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर आदिवासी समाजातील महिलांच्या मदतीने बांबूपासून वस्तू तयार करू लागली. एक-एक करीत सर्व प्रकारच्या वस्तू तयार करण्याचे कौशल्य प्राप्त केले. आजघडीला बांबूपासून राख्या तयार करण्याचे काम सुरू आहे. देशातील दिल्ली, झारखंड, जबलपूर, ठाणे, पुणे, मुंबई, गुडगाव येथून राख्यांची मागणी आली. दुबई येथून आलेली मागणी कुरिअर सेवा बंदमुळे पूर्ण करता आली नाही. मात्र, आतापर्यंत तब्बल 5 ते 6 हजार राख्यांची विक्री करण्यात यश आल्याचे मीनाक्षी मुकेश वाळके यांनी सांगितले. 

चंद्रपुरातील बंगाली कॅम्प परिसरात वाळके कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. मीनाक्षी वाळके यांनी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथून बांबूपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर घरातूनच व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, वस्तू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य ठेवण्याएवढी पुरेसी जागा घरी नाही. त्यामुळे त्याच परिसरात भाड्याची खोली केली. पती आणि मुलासोबतच वास्तव्य करीत त्याच घरातून बांबूपासून वस्तू तयार करण्याचे काम सुरू केले. कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्यापासून सुरू झालेला व्यवसाय आता राखी तयार करण्यापर्यंत पोहोचला आहे. 
मीनाक्षी वाळके यांनी स्वत: स्वयंरोजगार शोधला. सोबतच शहरापासून काही अंतरावर असलेल्या खेडेगावातील आदिवासी महिलांनासुद्धा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या महिला बांबूपासून वस्तू तयार करण्याच्या कामात मदत करीत आहेत. जीवनात काहीतरी करण्याची जिद्द मनात बाळगून प्रयत्न केल्यास यश निश्‍चित येते, हे मीनाक्षी वाळके यांनी दाखवून दिले आहे. हाताला काम नाही. आता पुढे कसे असे म्हणत हातावर हात मारून बसणाऱ्यांसाठी मीनाक्षी वाळके यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. 

ब्युटी कन्सेप्ट स्पर्धेसाठी तयार केले बांबूचे मुकुट 
दिल्ली येथे 2019 मध्ये जागतिक दर्जाच्या ब्युटी कन्सेप्ट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना मुकुट देऊन गौरविले जाते. आतापर्यंत मेटलचे मुकुट दिले जात होते. मात्र, त्यावर्षी मीनाक्षी वाळके यांनी बांबूपासून तयार केलेले मुकुट या स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात आले. एखाद्या जागतिक स्पर्धेत बांबूपासून मुकुट तयार करणारी मीनाक्षी वाळके ही देशातील पहिली महिला ठरली आहे. यासर्व कार्याची दखल घेऊन दिल्लीच्या शक्ती फाउंडेशनने टॉप-20 पुरस्कार दिला. महिला सक्षमीकरणासाठी दिल्ली येथे राष्ट्रीय नारी शक्ती सन्मान व पर्यावरण विभागाचा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. तर, इजराइल येथील जेरूसलेम येथील एका आर्ट स्कूलने पाच दिवस मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. 

बांबूपासून सर्वच प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू तयार केल्या जातात. मात्र, मागीलवर्षीपासून बांबूपासून राखी तयार करण्याचे काम हाती घेतले. गतवर्षी केवळ 500 राख्यांची विक्री करता आली. मात्र, यावर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आतापर्यंत देशभरात सुमारे 5 ते 6 हजार राख्यांची विक्री झाली आहे. 
-मीनाक्षी मुकेश वाळके,चंद्रपूर 

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बांबूपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून जिल्ह्यातील अनेकांना रोजगार प्राप्त होत आहे, ही समाधानाची बाब आहे. 
- राहुल पाटील,संचालक, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर. 

-संपादन: चंद्रशेखर महाजन  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT