Bamburakhi tribal women has reached in sixty countries Amravati sakal
विदर्भ

अमरावती : आदिवासी महिलांनी तयार केलेली बांबूराखी पोहोचली साठ देशांत

एक लाखाहून अधिक विक्री; आदिवासी महिलांनी केली तयार

मोहन गायन

जामली (जि. अमरावती) : बहीणभावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण दोन दिवसांवर आला आहे. राख्यांची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. प्रत्येक राखी सणाला भावाला काहीतरी वेगळी राखी बांधायची, अशी बहिणीची इच्छा असते. अशातच काही नैसर्गिक साधनांपासून बनवलेल्या बांबूराखीला मेळघाटातच नव्हे, तर ६० देशांतही मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे.

सुनील देशपांडे यांनी १९९७ साली संपूर्ण बांबू केंद्राची स्थापना केली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी डॉ. नीरूपमा देशपांडे हे कार्य सांभाळत आहेत. २०१८ साली मेळघाटातील बांबूपासून बनवलेली राखी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधली होती. त्यानंतर मिळालेली प्रसिद्धी आणि आयसीआर यांच्या सहयोगाने विदेशातही राखी पाठविण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आतापर्यंत ६० हजार राख्या जपान, अमेरिकासह ६० देशांत पोहोचविण्यात आल्या आहेत. संपूर्ण बांबू केंद्राच्या संचालक डॉ. नीरूपमा देशपांडे यांनी सांगितले की, ऑनलाइन राख्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. नागपुरातही लोक जास्तीत जास्त ऑनलाइन राख्या मागवीत आहेत.

फोटो राखीला जास्त मागणी

भावाच्या फोटोवाली राखीचे चलन मागील दोन वर्षांपासून सुरू झाले आहे. गुजरात व मुंबईला या राख्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. यात लहान मुलांनाच नाही, तर मोठ्या लोकांनासुद्धा फोटोवाली राख्यांची चटक लागलेली आहे. शहरात जवळपास सर्वच फोटो स्टुडिओमध्ये या राख्या मिळत आहेत. सीझनमध्ये ४०० पेक्षा जास्त राख्या एका स्टुडिओमध्ये बनविल्या जातात.

महिलांना मिळाला रोजगार

मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी गावातील महिला राख्या बनविण्याच्या कामात जोडल्या गेल्या आहेत. आता त्यांना बाराही महिने राख्या बनविण्याचे काम पुरविले जात आहे. त्यात त्यांना बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध होत आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक राख्या बनवून बाजारात विक्रीसाठी पाठविल्यात. लोकांचा प्रतिसाद पाहता शाळकरी मुलांसाठी राखी बनविण्याची किट तयार केल्या आहेत व मुलांना शिकविले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती; NIAची मुंबई उच्च न्यायालयात धाव

SCROLL FOR NEXT