The banner of program in the hands of the patient who did the fruit distribution 
विदर्भ

व्वा रे काँग्रेस! राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त केले फळवाटप आणि रुग्णाच्या हातात दिले हे...

दीपक खेकारे

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते, खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कॉंग्रेस पक्षाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. यातच गडचांदूरमध्ये कॉंग्रेस पक्षाने राबवलेला उपक्रम सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असल्याने जोरदार चर्चा होत आहे. या चर्चेमागील कारण अजबच आहे.

गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात कोरपना तालुका कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप केले. बेडवर ज्या रुग्णाला फळवाटप केले तोच रुग्ण ठणठणीत असल्यासारखा रुग्णालयाबाहेर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत बॅनर पकडून उभा दिसत आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेसच्या नेत्यांसोबत सदर रुग्णाने बॅनर पकडून आपले फोटोही काढून घेतले. तेच फोटो कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने परिसरात खमंग चर्चा होत आहे. काही नागरिकांना फळवाटप कार्यक्रमातील हा प्रकार समजल्याने या उपक्रमाचे फोटो सोशल मीडियावर नागरिकांसाठी विनोदाचा भाग बनला आहे.

सोशल मीडीयावर व्हायरल झालेल्या फोटोत ज्या रुग्णाला फळवाटप केले, तोच रुग्ण कॉंग्रेस नेत्यांसोबत हातात बॅनर पकडून फोटोत दिसत आहे. फळवाटप केलेला व बॅनर पकडणारा एकच व्यक्ती असून, कॉंग्रेस नेत्यांच्या ही बाब लक्षात कशी आली नाही? याचे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. गडचांदूर रुग्णालयातील कॉंग्रेसच्या या अजब फळवाटपाची सोशल मीडियावर चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT