cyber crime 
विदर्भ

सावधान ! युवकाच्या खात्यातून ९५ हजार लंपास, कस्टमरकेअरच्या नावाने असलेले नंबर नक्की कोणाचे?

संतोष ताकपिरे

अमरावती : वेबसाइटवर कस्टमर केअरच्या नावाने असलेले नंबर नक्की कोणाचे आहेत? असा प्रश्न ग्राहकांना पडतो हे. कारण कस्टमर केअरला लावलेला फोन फसवेगिरी करणा-यांच्या मोबाईल क्रमांकावर जात आहे. तोतयांनी सांगितल्यानुसार प्रोसेस केल्या जाते. त्यामुळे फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे.

कुणाल किशोर गुप्ता (वय २६, रा. पटवाचौक, मोरबाग), असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. शहर सायबर ठाण्यात कुणालच्या तक्रारीवरून तोतया कस्टमर केअर संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

कुणालला त्याच्या जावयास पैसे पाठवायचे होते. त्यासाठी त्याने फोन पे अ‍ॅपचा वापर केला. पैसे खात्यातून कपात झाले तरी त्याच्या जावयाच्या खात्यात मात्र जमा झाले नव्हते. त्यामुळे कुणालने कस्टमर केअर नावाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा संबंधित सीमकार्ड धारकाने पैसे परत मिळविण्यासाठी एनीडेक्स हेअ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. ठरल्यानुसार संपर्क साधणा-या अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकून कुणालने हे अ‍ॅप डाउनलोड केले होते.

त्यानंतर वेगवेगळ्या अशा ८३८८९३७४०१, ९८३२२३३०६५, ७३१९०४६६८९ व ६२८९९३४२७४ चार क्रमांकांवरून कुणाल सोबत मंगळवारी (ता. चार) दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत संपर्क साधल्या गेला. अ‍ॅप डाउनलोड करून आवश्यक माहिती शेअर केल्याने कुणालच्या बँकखात्यात असलेली ९४ हजार ९८१ रुपये एवढी रक्कम परस्पर कपात झाल्याचा मॅसेज त्याच्या मोबाईलवर आला. कुणालने तत्काळ सायबर ठाण्यात तक्रार नोंदविल्याने गुन्हा दाखल झाला.

चोवीस तासांत दुसरी घटना
शहरात सोमवारी (ता. तीन) एका सुशिक्षित महिलेने क्यूक सपोर्ट अ‍ॅप डाउनलोड केले होते. तिच्याही खात्यातून ८५ हजारांची रोकड तोतयाने हडपली. त्यानंतर सुशिक्षित व्यक्तीस लुबाडण्याची चोवीस तासांत ही दुसरी घटना घडली.

सततच्या आवाहनाकडेही दुर्लक्ष
फसवणुकीच्या शक्यतेमुळे अनोळखी व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे प्रोसेस करू नये, असे आवाहन सायबर पोलिस, बँका सतत करीत असतात त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना वाढत आहे.  

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Land Scam: सरकारी जमिनीवर माफियांचा डोळा! पुण्यात कृषी विभागाच्या जमिनीचा मोठा अपहार; अधिकारीही अडचणीत

Latest Marathi News Live Update : मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी मंगळवारी होणार निर्णय

बाथरुमचा पाइप डायरेक्ट समुद्रात... वनिताच्या घरात घुसलेलं २६जुलैच्या पुराचं पाणी; म्हणाली, 'शाळेत जायला निघालेलो आणि...

Eknath Shinde Vs BJP : कोकणात एकनाथ शिंदे स्वबळावर लढणार, दीपक केसरकरांनी भाजपला इशारा देत विजयाचं गणित सांगितलं...

Malkapur Accident : 'ट्रकच्या धडकेत तिघे गंभीर जखमी'; मलकापूरनजीक अपघात, दोन महामार्ग कर्मचाऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT