सेवाग्राम : विचार व्यक्त करताना अभिनेत्री अलका कुबल; मंचावर रामजराजे स्वराचार्यजी ऊर्फ माऊली महाराज, खासदार डॉ. विकास महात्मे आणि इतर मान्यवर 
विदर्भ

शेतकरी अन्नदाता असल्याची जाणीव ठेवा : अभिनेत्री अलका कुबल 

सकाळ वृत्तसेवा

सेवाग्राम (जि. वर्धा) : आपला देश कृषिप्रधान आहे आणि शेतकरी हा अन्नदाता आहे, याची प्रत्येकाला जाणीव असावी. खासदार डॉ. विकास महात्मे यांनी निःस्वार्थ मनाने राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता महात्मा गांधी निर्धार पदयात्रा काढून समाजात नवचैतन्य निर्माण केले आहे, असे मत अभिनेत्री अलका कुबल यांनी व्यक्त केले. 

या पदयात्रेमध्ये शेतकरी मार्गदर्शन, स्वच्छतेचा संदेश, प्रबोधन करण्यात आले. स्वच्छता अभियान ही काळानुसार गरज आहे. युवकांनी या अभियान सहभागी व्हावे, असे आवाहन अलका कुबल यांनी केले. 

सेवाग्राम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गांधी संकल्प पदयात्रेचा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून अलका कुबल बोलत होत्या.

यावेळी रुख्मिणी विदर्भ पीठाधीश रामजराजे स्वराचार्यजी ऊर्फ माऊली महाराज, खासदार डॉ. विकास महात्मे, जिल्हा परिषदेचे सभापती विजय आगलावे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्‍याम कार्लेकर, शोभा तडस, सरपंच सुजाता ताकसांडे, संतोष महात्मे, जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगावे आदींची उपस्थिती होती. 

स्वच्छता राखणे आमची जबाबदारी 

15 जानेवारीपासून गुरुकुंज (मोझरी) येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. पाच दिवसांत ही यात्रा सेवाग्राम येथे पोहोचली. रविवारी (ता. 19) सेवाग्राम येथे समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी बोलताना खासदार डॉ. विकास महात्मे म्हणाले, सभोवतालची स्वच्छता राखणे ही आमची जबाबदारी आहे. 

सफाई कामगारांचा सन्मान झाला पाहिजे 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. त्यांच्या प्रेरणेने काम पुढे घेऊन जायचे आहे. त्यामळे सफाई कामगारांचा सन्मान झाला पाहिजे. पाच दिवसात या पदयात्रेमध्ये ग्रामीण भागातून उत्तम प्रतिसाद मिळाला. 

जाणून घ्या : विवाहसोहळ्यातून त्या शेतकरी कुटुंबांना मिळाला आधार

शेतकरी आणि बुद्धिवान व्यक्‍ती देशाची शक्ती 

पीठाधीश रामराजे स्वराचार्यजी म्हणाले, संपूर्ण देशाला प्रेरणा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महापुरुषांनी नेहमी खऱ्या मार्गाने चालण्याचे सांगितले. समाजाला चांगली दिशा दिली. शेतकरी आणि बुद्धिवान व्यक्‍ती देशाची शक्ती आहे. पिकांवर शेतकरी कीड प्रादुर्भाव होऊ नये म्हणून औषधांची फवारणी करतो, तशी वाईट विचारावर फवारणी करून चांगले विचार आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

कार्यक्रमाचे संचालन सुनीता महात्मे यांनी केले. यावेळी ग्रामीण महिला, पुरुष, शेतकरी युवकांचा सत्कार करण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Blow : महेंद्रसिंग धोनीनंतर CSK चा आणखी एक मॅच फिनिशर झाला जखमी, २-३ सामन्यांना मुकणार; IPL 2026 मध्ये उद्या RR ला भिडणार

काँग्रेसकडून युद्धाचा राजकीय फायद्यासाठी वापर, जनतेचा जीव धोक्यात टाकतायत; PM मोदींचा घणाघात

Pune Drowning: सोरतापवाडीतील विहिरीत पोहताना २० वर्षीय तरुणाचा दम कोंडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Solapur Farmers Protest: मंगळवेढ्यात ३०,७४२ शेतकऱ्यांचा पिकविमा थकित; विमा कंपनीच्या दिरंगाईविरोधात संताप, आंदोलनाची चेतावणी

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सकडून १६.३५ कोटी पगार; हार्दिकने गर्लफ्रेंडसाठी खरेदी केली कोट्यवधींची कार... भारतातील पहिलाच मॉडल

SCROLL FOR NEXT