Be careful when buying an old vehicle ... 
विदर्भ

जुने वाहन खरेदी करताय तर सावधान...

भगवान वानखेडे

अकोला : जुन्या वाहनांची खरेदी करणाऱ्यांना आधीच्या वाहन मालकाने केलेल्या वाहतूक नियमभंगाचा फटका बसत असल्याचे निदर्शनास येत आहे. जुन्या मालकाने केलेल्या नियमभंगप्रकरणी वेगवेगळे दंड नव्या वाहन मालकांना भरावे लागत असल्याने यातून मनस्तापाला सामोरे जावे लागते. या सर्वांतून सुटका मिळविण्यासाठी जुने वाहन खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

जुन्या वाहनांची खरेदी करणाऱ्यांना आधीच्या वाहन मालकाने केलेल्या वाहतूक नियमभंगाचा फटका बसत असल्याचे निदर्शनास येत आहे. जुन्या मालकाने केलेल्या नियमभंगप्रकरणी वाहतूक पोलिसांकडून कारवाई केलेली असते. मात्र, त्याने दंड न भरल्याने तो प्रलंबित दंड नवीन मालकाला पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान अडविल्यानंतरच समोर येतो. त्या वेळी दंडावरून वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांत खटके उडतात.. त्यामुळे जुने वाहन खरेदी करताना खरेदीदारांना आवश्यक कागदपत्रांसह 'ई-चलन'चीही तपासणी करावी लागणार आहे.

शहरात दर वर्षी सरासरी तीन ते चार हजार वाहनांची विक्री होते. तसेच, जुन्या वाहनांची विक्री होण्याचे प्रमाणही अधिक आहे. ही जुनी वाहने खरेदी करताना, वाहनाची कागदपत्रे, आरटीओचे कर भरल्याच्या पावत्या, आरसी आदी कागदपत्रे तपासली जातात. मात्र, जुन्या वाहनमालकाने त्या गाडीवरील थकीत दंडाचा भरणा केला आहे किंवा नाही, हे तपासण्याला प्राधान्य दिले जात नाही. मात्र, पोलिस कारवाईच्या वेळी वाहनावरील थकीत दंडाची माहिती तपासली जाते. तेव्हा प्रलंबित दंडाची माहिती पुढे येते. यातून बचावासाठी जुने वाहन खरेदी करताना सर्व कागदपत्रांची आवश्यक ती तपासणी करून घेणे गरजेचे असल्याचे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात येत आहे.

दंडावर पाणी सोडायचे का ?
प्रलंबित दंड असलेल्या जुन्या वाहनांची विक्री केल्यानंतर, त्या वाहनाचा नवीन मालक मागील दंड भरण्यास नकार देतो. त्यामुळे काही ठिकाणी हुज्जतही घातली जाते. मग हा प्रलंबित दंड भरायचा कोणी, की वाहतूक पोलिसांनी अशा दंडावर पाणी सोडायचे, असा प्रश्न वाहतूक पोलिसांनाच पडला आहे.

जुन्या मालकांकडून नकार
जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करताना, 'ई-चलना'द्वारे पाठविलेल्या दंडाची माहिती घेण्याचे लक्षात येत नाही. मात्र, नंतर खरेदीदार दंडाबाबतची तक्रार घेऊन येतात. त्यावेळी वाहनाच्या जुन्या मालकाकडून सकारात्मक प्रतिसाद दिला जात नाही, असा अनुभव जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांनी सांगितला.

नियमाने दंड वसूल करण्यात येईल
वाहन कोणाचेही असो, त्या वाहनांवर कुठल्याही प्रकारचा दंड असेल तर त्याच्यावर कायद्याने कारवाई करून त्याच्याकडून नियमाने दंड वसूल करण्यात येणार आहे.
-गजानन शेळके, पोलिस निरीक्षक , शहर वाहतूक शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Raj Thackeray : लोकसभेनंतर 6 महिन्यांत 40 ते 60 लाख मतदार कसे वाढले? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; महाराष्ट्रातील 'एसआयआर' रद्द करण्यावरही भाष्य

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील एसआयआर पूर्णपणे रद्द करावा आणि यापुढे मतदान बॅलेट पेपरवर घ्या - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT