File photo
File photo 
विदर्भ

चंद्रपूर : वेकोलि वसाहतीतून अस्वल जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : मागील अनेक दिवसांपासून दर्शन देणाऱ्या अस्वलाला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. त्यामुळे शक्तीनगर या वेकोलि वसाहतीतील नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. या रेस्क्‍यूमध्ये श्रीरामसेना, हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटीच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता.
शक्तीनगर वेकोलिची वसाहत ही वरवट जंगल परिसराला लागून आहे. त्यामुळे बिबट, अस्वल यासह अन्य वन्यप्राण्यांचे वसाहत परिसरात नेहमीच दर्शन होत असते. वन्यप्राण्यांच्या दर्शनामुळे येथील नागरिक रात्रीच्या वेळेस जीव मुठीत घेऊन ये-जा करीत असतात. मागील काही दिवसांपासून अस्वलाचे दर्शन होत होते. त्यामुळे नागरिकांत भीती व्यक्त होत होती. वनविभागाने अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात आली.
परिसरातील नागरिक, वन्यजीवरक्षम अजय यादव हे अस्वलीवर पाळत ठेवून होते. त्यानंतर वनविभागाला याची माहिती देत होते. दोन आठवड्यापूर्वी अस्वल विश्रामगृहाजवळ आसरा घेऊन होते. त्यानंतर परिसरातील दवाखाना परिसरात अस्वलाने रात्र काढली. याच कालावधीत ऑफिसर क्‍लब, क्वॉर्टरच्या मागील भागात दर्शनाला आली. त्यानंतर नागरिक गोळा झाले. अस्वलाला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अस्वल तेथून जात नसल्याने ते जखमी असावे, असा अंदाज बांधण्यात आला. त्यानंतर काल रात्री नितीन काळबांधे यांच्या किचनच्या भिंतीलगत काळ्या रंगाची अस्वल झोपलेल्या स्थितीत आढळून आले.
त्यानंतर नागरिकांनी वन्यजीवरक्षक अजय यादव, श्रीराम सेनेचे अजय यादव यांना कळविले. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यानंतर चंद्रपूरचे वनपरिक्षेत्राधिकारी कारेकर यांना कळविण्यात आले. तातडीने वरिष्ठ अधिकारी सोनकुसरे यांना माहिती देत कारेकर हे रॅपिड रिस्पॉन्स टीमचे डॉ. रविकांत खोब्रागडे, अजय मराठे व इतर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळावर हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटीचे साईनाथ चौधरी, दिनेश खाटे उपस्थित होते. अस्वल आजारी असल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी बांधला. त्यानंतर अस्वलाला बेशुद्ध करून जेरबंद करून पुढील उपचारासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर येथे पाठविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT