crime 01.jpg
crime 01.jpg 
विदर्भ

पोलिस असल्याची बतावणी करून केली मारहाण, मात्र तो निघाला...

सकाळ वृत्तसेवा

बोरगाव मंजू (जि.अकोला) : येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये पोलिस असल्याची बतावणी करून लोकांमध्ये नाहक दहशत निर्माण करून मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता.13) रात्री 10.30 वाजता दरम्यान उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.


प्राप्त माहिती नुसार, येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहीगाव गावंडे, धोतर्डी, यावलखेड, सांगळुद आदी गावात तोतया पोलिस सांगून गावातील निरपराध नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण करत असल्याची तक्रार आकाश वाकपांजर (रा.सांगळुद) यांनी पोलिस ठाण्यात दिली.

त्यामध्ये त्यांनी चार लोकांनी पोलिस असल्याची बतावणी करून एका पोलिस कर्मचाऱ्यांच्या नावाचा वापर करून फिर्यादीच्या घरात घुसून पोलिसांकडे असलेल्या काठीने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली असे नमूद केले. यावरून पोलिसांनी विविध कलमान्वये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष अघाव, पो.हे.का भागवत कांबळे, अशोक इंगळे हे करीत आहेत.

सह चार जनांवर विविध कलमान्वे गुन्हे दाखल
बोरगाव मंजू पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्जू ठाकूर याच्या सह चार जनांवर विविध कलमान्वे गुन्हे दाखल केले. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
-हरिष गवळी, ठाणेदार, बोरगाव मंजू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT