Bee attack on tiger search squad in Chandrapur district 
विदर्भ

शेतात वाघ असल्याची वनकर्मचाऱ्यांना मिळाली माहिती; शोधकार्य सुरू असताना मधमाशांनी केला हल्ला

श्रीकांत पेशेट्टीवार

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : शेतशिवारात वाघाचे दर्शन झाल्याची माहिती मिळताच वनकर्मचारी वाघाच्या शोधार्थ निघाले. त्यांच्या सोबतीला गावकरीही होते. या पथकावर मधमाशांनी अचानक हल्ला चढविला. यात वनकर्मचाऱ्यासह २० गावकरी जखमी झाले. ही घटना रविवारी (ता. ६) दुपारच्या सुमारास तालुक्‍यातील शिवणी परिसरात घडली. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोंडपिपरी तालुक्‍यात शिवणी संगमाचे मध्यभागी बेट आहे. या बेटावर शिवणी गावातील शेतकऱ्यांची शेती आहे. या बेटात काही शेतकऱ्यांना वाघ दिसला. त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून शोधमोहीम सुरू केली.

वनकर्मचाऱ्यांच्या सोबतीला गावकरीही होते. शोधाशोध सुरू असताना मधमाशांनी अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने सर्वजण पळू लागले. या धावपळीत काही जखमी झाले. काहींनी चक्क जवळच्या नदीपात्रात उडी घेऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, मधमाशांनी हल्ला करून सुमारे २० नागरिकांना जखमी केले. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या माहितीनंतर शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र, वाघ नाही आणि पगमार्कही आढळून आले नाही.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात मोठी उलथापालथ! इतकी वर्ष संघासोबत असलेल्या भरवशाच्या खेळाडूने साथ सोडली, MS Dhoni...

Newly Married Woman : 2 दिवसांनी होतं मुलीचं बारसं, घरात चालू होती तयारी; पण त्याआधीच 23 वर्षांच्या 'या' उच्चशिक्षित माऊलीनं...

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Pune Airport: पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल ‘बिकास’च्या प्रतीक्षेत; दीड वर्षापासून बंद, पुनर्विकासासाठी २४ कोटी रुपयांचा खर्च

Pune News: चिखली-कुदळवाडीनंतर मोईतही प्रशासनाचा बुलडोझर; अवैध भंगार व्यवसायावर कारवाई, खेड तालुक्यात प्रशासनाची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT