file photo 
विदर्भ

लॉकडाउनच्या काळातही लाभार्थ्यांना मिळाले नाही स्वस्त धान्य...केली दुकानदारांची तक्रार

सकाळ वृत्तसेवा

गोरेगाव (जि. गोंदिया) : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ देण्याचे शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, जिल्हा अन्नपुरवठा अधिकाऱ्यांनी गोरेगाव तालुक्‍यातील स्वस्त धान्य दुकानात तांदूळ पाठविले. पण स्वस्त धान्य दुकानदारांनी ऑनलाइन नोंदणीकृत असलेल्या लाभार्थ्यांना तांदळाचे वाटप केले नाही, अशी तक्रार बोरगाव येथील 5 लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, सरपंच, तंटामुक्त गाव समिती यांना शनिवारी (ता. 18) केली आहे.

बोरगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार अशोक मेश्राम यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना तांदळाचे वाटप केले. लॉकडाउनच्या काळात प्रत्येक लाभार्थ्यांना रेशनचे धान्य मिळावेत, असे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळेच शासनाने सर्व शिधापत्रिका ऑनलाइन नोंदणीकृत केल्या आहेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची नावे त्यात जोडली गेली आहेत.

स्वस्त धान्य दुकानदार घेत आहेत संधीचा फायदा

परंतु, शिधापत्रिका या नवीन तयार करण्यात आल्या नसल्याने ऑनलाइन नोंदणीकृतप्रमाणे लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेत नोंदी नाहीत. याच संधीचा फायदा स्वस्त धान्य दुकानदार उचलत आहेत, असे प्रकार तालुक्‍यातील 99 स्वस्त धान्य दुकानात असल्याचे बोलले जात आहे.

दुकानदाराने 10 ते 15 किलो धान्य कमी दिले

कुटुंबातील सदस्यांची संख्या व शिधापत्रिकेत नोंदी असलेल्या संख्या यांची पडताळणी करण्यासाठी शासनाने दिलेल्या ऑनलाइन लिंक कुंवरलाल कोल्हे, मूलचंद रहांगडाले, हरिश्‍चंद्र रहांगडाले, छन्नीलाल पारधी, प्रीतम कोहळे (सर्व रा. बोरगाव) यांनी तपासणी केली. परंतु स्वस्त धान्य दुकानदार अशोक मेश्राम यांनी लाभार्थ्यांची फसवणूक केली आहे. प्रत्येक कुटुंब संख्यानिहाय धान्य न देता 10 ते 15 किलो धान्य कमी दिले, अशी तक्रार लाभार्थ्यांनी दाखल केली आहे.
दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ऑनलाइन शिधापत्रिका नोंदणी सदस्यांची नावे व जुन्या असलेल्या शिधापत्रिकेतील नावे यात कोणत्या निकषांवर (धान्य) तांदळाचा पुरवठा रेशन दुकानदारांना करण्यात आला, याची माहिती देण्यात यावी, न्याय देण्याची मागणीसुद्धा तक्रारदारांनी केली आहे.

दोषींची चौकशी करणार
शिधापत्रिका ऑनलाइन नोंदणीकृत करण्यात आल्या आहेत. परंतु, जुन्याच लोकसंख्यानिहाय धान्याचा पुरवठा केला जातो. बोरगावची तक्रार आली आहे. चौकशीत दोषी आढळल्यास धान्य दुकान परवाना रद्द करण्याची शिफारस केली जाईल.
- श्री. मिर्झा, धान्य पुरवठा अधिकारी, गोरेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT