ration1.jpg 
विदर्भ

लाभार्थ्यांना धान्यापासून ठेवले वंचित!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : धान्याची उचल न करता लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवणाऱ्या अकोट तालुक्यातील मौजे पारडा व देवर्डा येथील रास्त भाव दुकानदार व्ही.आर. खोटरे यांचे प्राधिकारपत्र (परवाना) निलंबित करण्यात आले आहे. सदर कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू. काळे यांनी रास्त भाव दुकानात जावून केल्यामुळे इतर रास्त भाव दुकानदरांचे धाबे दणाणले आहेत.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला अन्न दिवस व 14 तारखेपर्यंत अन्न सप्ताह साजरा करण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यातील पुरवठा अधिकारी व रास्तभाव दुकानदारांना दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेपर्यंत रास्तभाव दुकानातून धान्याचे 100 टक्के वाटप करणे रास्तभाव दुकानदारांना बंधनकारक आहे.

अकोट तालुक्यातील मौजे पारडा व देवार्डा येथील रास्तभाव दुकानदार व्ही.आर. खोटरे यांनी डिसेंबर 2019चे मागणीपत्रक 29 नोव्हेंबर रोजी मंजूर केल्यानंतर सुद्धा निश्‍चित मुदतीत धान्याची रक्कम शासन जमा केली नाही तसेच धान्याची उचल सुद्धा केली नाही. त्यामुळे त्यांच्या दुकानाशी संलग्न असलेले लाभार्थी धान्यापासून वंचित राहिले.

अशा प्रकारचा अहवाल अकोटचे तहसीलदार व पुरवठा निरीक्षक यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू. काळे यांच्याकडे पाठवला. सदर अहवालाची पडताळणी करून योग्य कार्यवाही करण्यासाठी पुरवठा अधिकाऱ्यांनी सदर रास्तभाव दुकानाची पारडा व देवार्डा येथे जावून तपासणी केली. त्यामध्ये पुरवठा अधिकारी काळे यांना दुकानदार खोटरे लाभार्थ्यांना वेळेवर धान्याचा पुरवठा करण्यास सक्षम नसल्याचे आठळल्यामुळे त्यांच्या दुकानाचे गुरुवारी (ता. 12) प्राधिकारपत्र निलंबत करण्यात आले आहे.

या प्रकरणाची तहसीलदार अकोट यांनी एक महिन्याच्या आत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सुद्धा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT