विदर्भ

नागपूरच्या लक्ष्मणचे हस्ताक्षर "लयं भारी'

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : गुरुजनांनी बालपणी शुद्धलेखन आणि हस्ताक्षरासाठी आफले कान पकडल्याचे अनेकांना आजही आठवते. परंतु, स्मार्ट मोबाईल आणि की बोर्डच्या युगात हस्ताक्षराकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते. परंतु, सुवाच्च हस्ताक्षर स्पर्धेत शहरातील लक्ष्मण बावनकुळे कौतुकास पात्र ठरला आहे. त्याने जागतिक हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून आपला ठसा उमटविला आहे.
लक्ष्मण बावनकुळे हा 32 वर्षीय तरुण कोराडी येथील औष्णिक विद्युत केंद्रात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहे. विद्युत केंद्र परिसरातील वसाहतीमध्ये तो वास्तव्यास आहे. या युवकाने स्पर्धेच्या सर्व श्रेणीमधून प्रथम क्रमांक पटकावीत बाजी मारली. लहान पणापासूनच आखीव, रेखीव आणि सुवाच्च अक्षरांमध्ये लिहिणे ही त्याची आवड. याच आवडीची दखल "जागतिक हस्ताक्षर स्पर्धेच्या' माध्यमातून जागतिक स्थरावर घेण्यात आली आहे. जागतिक हस्ताक्षर स्पर्धेच्या अमेरिकेतील न्यूयॉर्कस्थित आंतरराष्ट्रीय मुख्यालयाकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जोडून लिहिलेले हस्ताक्षर, कलात्मक हस्ताक्षर, हस्तलिखित हस्ताक्षर अशा विविध श्रेणीमध्ये या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. 1 जानेवारी ते 30 जूनदरम्यान ही स्पर्धा 65 वर्ष आणि त्यावरचे, 20 ते 64 वर्ष, 13 ते 19 वर्ष, 8 ते 12 वर्ष, 7 वर्ष ते खालील या वयोगटामध्ये आयोजित करण्यात आली होती.
डिसेंबरमध्ये पारितोषिक वितरण
लक्ष्मण याने 20 ते 64 वयोगटातून कलात्मक हस्ताक्षर प्रकारामध्ये सहभाग घेतला होता. त्याने या हस्ताक्षर प्रकारासह सर्व गटातून प्रथम क्रमांक प्राप्त करीत स्पर्धेमध्ये बाजी मारली. त्याची निवड झाल्याचे स्पर्धेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी केट ग्लॅडस्टोन यांनी ई-मेलद्वारे कळविले आहे. डिसेंबर महिन्यामध्ये या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा अमेरिकेमध्ये होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT