banavt nota 
विदर्भ

सावधान ... बनावट नोटा चलनात आल्या

सकाळ वृत्तसेवा

मेडशी : आठवडी बाजाराच्या गर्दीचा फायदा घेत, तिघांनी 50 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानदारांना संशय आल्याने दोघांना पकडून स्थानिक पोलिस चौकीत नेण्यात आले. हा प्रकार गुरुवारी (ता.17) दुपारी येथील आठवडी बाजारात घडला. त्यातील दोघे जण पळूण जाण्यात यशस्वी झाले.

हे वाचा - जिल्हा परिषदवर पुन्हा भारिपची सत्ता
दोघे पळूण जाण्यात झाले यशस्वी
येथील आठवडी बाजारामध्ये गुरुवारी (ता.17) दुपारी एक वाजता एका चारचाकी वाहनातून चार व्यक्ती आले. त्यापैकी तिघांनी आठवडी बाजारात 50 रुपयांच्या नोटा देऊन काही साहित्य खरेदी केले. मात्र, काही दुकानदारांना या नोटा बनावट असल्याची शंका आली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यापैकी दोघांना पकडून स्थानिक पोलिस चौकीमध्ये घेऊन गेले. यावेळी जमादार सुरेंद्र तिखिले यांनी त्यांची चौकशी केली असता, दोघांजवळ व बाजारातून दुकानदारांनी आणून दिलेल्या नोटा असे एकूण एक हजार 450 रुपये आढळून आले. पोलिसांनी प्रतीक बाबाराव कांबळे (वय 25) व दिनेश राजेश देशमुख (वय 24) दोघेही रा. पूलगाव जि. वर्धा यांना ताब्यात घेतले. तसेच पुढील चौकशीकरिता मालेगाव पोलिस ठाण्यात नेण्यात आले. चारपैकी दोघे जण पळूण गेले आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT