file photo 
विदर्भ

सावधान... आता अटीत शुभमंगल, धान्याची नासाडी थांबली 

रूपेश खैरी

वर्धा : शुभमंगल सावधान... म्हणताच विवाह मंडपात उपस्थित वऱ्हाड्यांकडून वधूवरांवर अक्षतांचा वर्षाव होतो. यात अक्षतांच्या नावावर तांदूळ आणि ज्वारीचा खच मंडपात लागून मोठ्या प्रमाणात धान्याची नासाडी होते. यंदाच्या वर्षात कोरोनामुळे राज्यात बहुतांश विवाह रद्द झाले. ज्यांनी विवाह उरकवला त्यांना त्यांना तो अटीत करावा लागला. यामुळे दरवर्षी हजारो क्‍विंटल धान्याची होणारी नासाडी यंदा कोरोनामुळे वाचली. 

अक्षतांची मोठ्या प्रमाणात उधळण 
साधारणत: विवाहात पाच मंगलाष्टकांची प्रथा आहे. या प्रत्येक मंगलाष्टकाच्या शेवटी कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान... म्हणताच उपस्थित वऱ्हाड्यांकडून तांदळाच्या आणि ज्वारीच्या अक्षतांची मोठ्या प्रमाणात उधळण होते. विवाह सोहळा श्रीमंतीचे दर्शन घडविणारा असो वा ग्रामीण भागातील साध्यात साधा असो. यात अक्षतांना महत्त्व देण्यात आले आहे. या अक्षतांसोबतच मंडपात लग्न लावतानाही मोठ्या प्रमाणात तांदळाची अक्षत वापरल्या जाते. यंदा विवाहाचा हंगाम कोरोनाच्या सावटात आला. विवाह लावताना शासनाने घातलेल्या अटी आणि नियमांचे पालन करावे लागले. अनेकांना घरच्या घरी विवाह ओटोपावा लागला. आता विवाह करण्यासाठी 50 जणांचीच परवानगी देण्यात आली आहे. त्यातही अनेक अटीं देण्यात आल्या आहेत. या अटी आणखी किती दिवस राहतात याचा नेम नाही. या अटीत विवाह झाले तर धान्याच्या होणाऱ्या नासाडीला मोठ्या प्रमाणात ब्रेक बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

विविधारंगी अक्षत 
विवाह सोहळ्यात तांदळची अक्षत तयार करताना पूर्वी एकाच लाल आणि ज्वारीची पिवळी रंगाची असायची. याकरिता कुंकू आणि हळद वापरण्यात येत होती. आता ही अक्षत विविधारंगी झाली आहे. हिरवी, पिवळी, गुलाबी, नारंगी अशा अनेक रंगाची अक्षत विवाह सोहळ्यात वापरण्यात येते. 

एका सोहळ्यात साधारणत: पाच किलो अक्षत 
पार पडणाऱ्या एका विवाह सोहळ्यात सरासरी पाच किलो तांदळाची अक्षत तयार होते. राज्यात विचार केल्यास होणाऱ्या विवाह सोहळ्यातून फेकण्यात येणाऱ्या अक्षताच्या नावावर किती तांदळाची नासाडी होईल, याचा अंदाज काढणे कठीण आहे. 

अन्नाची नासाडीही नाही 
सध्या विवाह सोहळ्यात जेवणावळीची जागा बुफेने घेतली आहे. लागेल तेवढे घ्यावे या मागचा उद्देश असला तरी यातून वाजवीपेक्षा अधिक अन्न घेत ते वाया जाण्याचा प्रकार अनेकवार अनेकांच्या लक्षात आला. यंदा या कोरोनामुळे या प्रकारालाही ब्रेक बसला आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अन्नाच्या नासाडीलाही ब्रेक बसला.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT