dead body 
विदर्भ

एकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू

सकाळवृत्तसेवा

तुमसर : तुमसर गावाशेजारील तलावात आंघोळीसाठी गेलेल्या तीन भावंडांचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली.

सुंदरटोला गावात ही घटना घडली असून मृतांमध्ये ६ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
मुस्कान धनलाल सर्याम (वय ११ वर्ष), प्रणय धनलाल सर्याम (वय १२ वर्ष), सारिका छबीलाल सर्याम (वय ६ वर्ष) अशी मृत्यूमुखी पडलेल्या अल्पवयीन मुलांची नावे आहेत.

एकाच कुटूंबातील ३ जणांना जीव गमवावा लागल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. मात्र, अत्यवस्थ असलेल्या तिघांना रूग्णालयात नेण्यापुर्वीच मृत्यू झाला होता.

रविवारची सुट्टी असल्याने मुले आंघोळीसाठी गेल्याचे सांगण्यात येते. या दरम्यान त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते वाहून जात होते. दरम्यान, गावकऱ्यांचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पाण्याबाहेर काढण्यास सुरवात केली. तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामे केले आहेत.त्यांचे मृतदेह शवविच्छेदनाकरता तुमसर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंचा पुण्यातील बड्या हॉटेल्सना दणका, मथुरा प्युअर व्हेज बंद ठेवण्याचे आदेश; ७ हॉटेल्सचे परवाने निलंबित

Pune: पुण्याहून सुटणाऱ्या १२ गाड्यांना प्रीमियम तत्काळ कोटा; रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणार महागात

Marathi Live Updates : पुण्यात झाडपडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ

मराठी अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, शेणाने घर सारवत दाखवली गावाची झलक; Viral Video

Pune: पुणेकरांसाठी मोठा दिलासा! अवघ्या २४ तासांत धरणांत ७०४ एमसीएफटी पाण्याची भर; १८ दिवसांची तहान भागणार

SCROLL FOR NEXT