Bharat Band support for women from suicidal families 
विदर्भ

Bharat Band Updates : बोथबोडन येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांचा भारत बंदला समर्थन

सूरज पाटील

यवतमाळ : जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या बोथबोडन या गावांमध्ये झाल्या आहे. राज्य व केंद्र सरकारने अनेक योजना शेतकऱ्यांसाठी लागू केल्या. मात्र, त्याचा कुठलाच फायदा या शेतकऱ्यांना झाला नाही. त्यामुळे या गावात आतापर्यंत २९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

नुकतेच केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याने पुन्हा देशोधडीला लागणार आहे. या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. यात आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी ठिय्या आंदोलन करून दिल्लीच्या  आंदोलनाला समर्थन दिले आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकरी या ठिकाणी जाऊन आंदोलन करीत आहेत. मात्र, ग्रामीण भागात असलेल्या या शेतकरी कुटुंबातील महिला दिल्लीमध्ये आंदोलनाला सहभागी होऊ शकत नाही.

मात्र, त्यांनी गावातूनच एक आंदोलन करून या कृषी कायद्याची होळी केली. जोपर्यंत हा कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत या आंदोलनाला समर्थन राहणार असल्याचा निर्धार या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT