Bharat Jodo Yatra 
विदर्भ

Bharat Jodo Yatra : विठ्ठल नामाच्या गजरात राहुल यांचे स्वागत

संतनगरीत वारकऱ्यांच्या स्वागताने काँग्रेस नेते भारावले..!

संजय सोनोने

शेगाव : विठ्ठल माझा... मी विठ्ठलाचा... या अभंगाच्या गजरात व टाळ मृदंगाच्या निनादात खा. राहूल गांधी यांचे स्वागत करण्यात आले. एक हजार वारकऱ्यांच्या स्वागताने शेगाव तालुक्यातील वरखेड फाट्यावर आज विठ्ठल नामाची शाळा भरली. या स्वागताने राहुल गांधीही भारावून गेले.

भारत जोडो यात्रेचे संतनगरी शेगाव तालुक्यात आगमन झाले. श्रीसंत गजानन महाराज यांच्या पावनभूमीत काँग्रेसचे खा. राहुल गांधी यांचे शुक्रवारी सकाळी आगमन झाले. संतनगरीच्या सीमेवर वरखेड फाट्यावर त्यांचे स्वागत झाले. यावेळी डोळ्यांचे पारणे फेडणारा, तसेच वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणारा वारकरी रिंगण सोहळा पार पडला.

भारत जोडो यात्रेचे संत नगरीच्या सीमेवर आगमन होताच खा. राहुल गांधी यांना वारकरी संप्रदायाचे दर्शन घडले. एक हजार वारकरी आणि विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळ्यात पाऊली खेळत टाळ मृदुंगाच्या गजरात व अभंगाच्या जयघोष करत राहुल गांधी यांचे आगळेवेगळे स्वागत केले. काँग्रेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी टोपी व दुपट्टा देऊन खासदार राहुल गांधी यांचे स्वागत केले.

समाधीपुढे नतमस्तक

शेगाव (जि.बुलडाणा) ः भारत जोडो यात्रेचे शुक्रवारी संतनगरी शेगाव येथे आगमन झाले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी (ता. १८) येथील श्रीसंत गजानन महाराज मंदिरात श्रींचे दर्शन घेतले व त्यानंतर प्रसादालयात जाऊन महाप्रसाद घेतला.

वारकरी संप्रदायाची महती देश आणि जगभर पोहोचावी या उद्देशाने भारत जोडो यात्रेनिमित्त संत नगरी शेगाव येथे वरखेड फाट्यावर एक हजार वारकऱ्यांचा रिंगण सोहळा पार पडला. यावेळी अभंग व टाळ मृदंगाच्या गजरात राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले.

- ज्ञानेश्वरदादा पाटील, काँग्रेस नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT