छायाचित्र 
विदर्भ

भिवापुरात चार तासांत 254 मिमी पाऊस

सकाळ वृत्तसेवा

भिवापूर : तालुक्‍यात शुक्रवारी अतिवृष्टीची नोंद झाली. तालुक्‍यातून वाहणाऱ्या मरू नदीला या पावसाळ्यात तिसरा पूर आला. तालुक्‍यातील सर्वच नदी-नाले ओव्हरफ्लो होऊन वाहत होते. भिवापुरातील दिघोरा, आझाद चौक, नीलजपुरा, शिवाजी ले-आउट, सिनेमा टाकीजमागील टोलीमध्ये घरात पावसाचे पाणी शिरले.

सकाळी सातपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दुपारी साडेबारापर्यंत 254 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक नुकसान दिघोरा वॉर्डात झाले. येथे जवळपास 40 तर सिनेमा टाकीज मागील टोलीत 13 घरामध्ये कमरेपर्यंत पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य व जीवनावश्‍यक वस्तूचे मोठे नुकसान झाले. या भागातील लोकांसाठी जिचकार सभागृह, पारवे सभागृह व पं. स.च्या बचत भवनात राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तहसीलदार साहेबराव राठोड सकाळपासून पूरपरिस्थिती वर लक्ष ठेवून होते. आमदार सुधीर पारवे, युवानेते राजू पारवे, कॉंग्रेसचे दिलीप गुप्ता, शिवसेनेचे संदीप निंबार्ते, न. प. उपाध्यक्ष वर्षा ठाकरे यांनी नुकसान ग्रस्त भागात भेट दिली. दिघोरा वॉर्डातील सखू ठाकरे, विजय बोळे, देवेंद्र पारखी, सुमित्रा, रूपेश आलाम, गणपत पसारे, मुरलीधर साहारे, दामू तरारे यांनी नुकसान झाल्याची माहिती दिली.
भिवापूरसहित तालुक्‍यातील नक्षी, चिखली मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने मोखाळा, भागेबोरी, सेलोटी, नक्षी, चिखली, वळध, रोहणा, गोंडबोरी, टाका, धामणगाव (वि. म.), पांढरवाणी, मांगली (जग.), गोहल्ली, तातोली, बोर्डकला, जवराबोडी (जुनी), किन्हाळा, धापर्ला, हत्तेबोडीसह नांद तसेच शेगाव, सोमनाळा, मोखेबर्डी मार्ग बंद झाला होता. सतत होणारा पाऊस व तिसऱ्यांदा पुराचे पाणी नदीकाठावरील शेतात शिरल्यामुळे सोयाबीन, कापूस, मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salim Wastik: 31 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात! ‘Ex-Muslim’ युट्यूबर निघाला कुख्यात अपहरणकर्ता, वाचा थरारक inside story

Post-Meal Watermelon and Bloating: आरोग्यासाठी चांगलं असलेलं कलिंगड जेवणानंतर खाल्ल्याने पोट का फुगतं? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

Latest Marathi News Live Update : विदर्भातील सर्व जिल्ह्यात उष्णतेचा "यलो अलर्ट" जारी

Pune Crime: पुण्यात बंगल्याच्या आवारातच गांजाची लागवड; लोहगाव पोलिसांची धडक कारवाई, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त!

Journalism Awards: अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना; अभिजित करंडेंना मोहन मस्कर सन्मान, कोल्हापूरमध्ये सन्मान सोहळा..

SCROLL FOR NEXT